व्हिडिओकॉन दिवाळखोरीत निघण्याची शक्यता 

वृत्तसंस्था
गुरुवार, 7 जून 2018

व्हिडियोकॉन कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीजवर बॅंकांची जवळपास २० हजार कोटी रुपये कर्जाची थकबाकी आहे आणि त्याचे हफ्ते वेळेवर जात नाहीत. त्यामुळे व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीजला लवकरच दिवाळखोर घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. 

नवी दिल्ली - व्हिडियोकॉन कंपनी दिवाळखोरीत निघण्याची शक्यता आहे. व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीवर बॅंकांची जवळपास २० हजार कोटी रुपये कर्जाची थकबाकी आहे आणि त्याचे हफ्ते वेळेवर जात नाहीत. त्यामुळे व्हिडीयोकॉन इंडस्ट्रीजला लवकरच दिवाळखोर घोषित केलं जाण्याची शक्यता आहे. 

व्हिडीयोकॉनला कर्ज देणाऱ्या बँकांनी याचिका दाखल करुन दिवाळखोर घोषित करण्याची मागणी केली आहे. त्याचबरोबर व्हिडीयोकॉन ग्रुपचा एकत्रित कर्जाचा बोजा जवळपास ४४ हजार कोटी रुपयांचा आहे. 

कंपनीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीच्या मुख्य अधिकाऱ्यांकडे 180 दिवसांचा वेळ असेल, त्यामध्येही कंपनीचे पुनुरुज्जीवन नाही झाले तर, अधिकचा 90 दिवसांचा कालावधी देण्यात येईल. या कालावधीत काही करता आले नाही तर मात्र व्हिडीयोकॉन कंपनीला दिवाळखोर म्हणून घोषित करण्यात येईल.

Web Title: Videocon faces bankruptcy proceedings

टॅग्स