कर्नाटकच्या मुख्य सचिवपदी विजय भास्कर यांची नियुक्ती 

वृत्तसंस्था
शनिवार, 30 जून 2018

कर्नाटक सरकारने आज टी. एम. विजय भास्कर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. भास्कर हे 1983 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहेत. सध्या ते अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहात आहेत. के. रत्नप्रभा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, रत्नप्रभा आज निवृत्त झाले, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

बंगळूर : कर्नाटक सरकारने आज टी. एम. विजय भास्कर यांची मुख्य सचिवपदी नियुक्ती केल्याची घोषणा केली. भास्कर हे 1983 च्या भारतीय प्रशासकीय सेवेच्या तुकडीतील अधिकारी आहेत. सध्या ते अतिरिक्त सचिव म्हणून काम पाहात आहेत. के. रत्नप्रभा यांच्या जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली असून, रत्नप्रभा आज निवृत्त झाले, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.

कर्नाटकातील विधानसभेच्या निवडणुकीमुळे केंद्राने मार्चमध्ये रत्नप्रभा यांना मुख्य सचिव म्हणून तीन महिन्यांची मुदतवाढ दिली होती. राज्य सरकारने त्यांना अजून तीन महिन्यांची मुदत वाढवून द्यावी, अशी मागणी केंद्राकडे केली होती, मात्र ती फेटाळून लावण्यात आली. सरकारी योजना सामान्यांपर्यंत पोचविण्याला आपले प्राधान्य असेल, असे भास्कर यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Vijay Bhaskar appointed as Karnataka's chief secretary