esakal | दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयशांती भाजपच्या वाटेवर
sakal

बोलून बातमी शोधा

Vijayashanti

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, माजी खासदार विजयशांती कॉंग्रेसला रामराम करून लवकरच भाजपमध्ये घरवापसी करू शकतात असे संकेत मिळाले आहेत. विजयशांती यांना गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले तर खुशबू यांच्यानंतर टॉलीवूडच्या आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीमुळे सर्वेसर्वा भाजप नेतृत्वाच्या महत्वाकांक्षी ‘दक्षिणायना’ला बळ मिळेल असे मानले जाते.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री विजयशांती भाजपच्या वाटेवर

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली - दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री, माजी खासदार विजयशांती कॉंग्रेसला रामराम करून लवकरच भाजपमध्ये घरवापसी करू शकतात असे संकेत मिळाले आहेत. विजयशांती यांना गळाला लावण्यात भाजपला यश मिळाले तर खुशबू यांच्यानंतर टॉलीवूडच्या आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीमुळे सर्वेसर्वा भाजप नेतृत्वाच्या महत्वाकांक्षी ‘दक्षिणायना’ला बळ मिळेल असे मानले जाते. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

भाजप तेलंगण राज्य उपाध्यक्ष डी के अरुण यांनीही विजयशांती भाजपच्या वाटेवर असल्याच्या वृत्तास दुजोरा दिला आहे. त्यांच्या भाजप प्रवेशासाठी ज्येष्ठ भाजप नेते भाजप सुनील देवधर यांनी विशेष प्रयत्न केल्याचे समजते.  विजयशांती यांनी आपला राजकीय प्रवास भाजपमधूनच सुरू केला होता. नंतर त्यांनी तेलंगण राष्ट्र समिती (टीआरएस) मध्ये प्रवेश केला व नंतर तेलंगण राज्यनिर्मितीच्या वेळी २०१४ मध्ये त्या कॉंग्रेसमध्ये दाखल झाल्या. सध्या ग्रेटर हैदराबाद महापालिकेच्या १ डिसेंबरला होणाऱ्या निवडणुकीच्या रणधुमाळीत त्या व्यग्र आहेत. मात्र कॉंग्रेसमध्ये त्या प्रचंड अस्वस्थ असल्याचे सांगितले जाते. कॉंग्रेसमध्ये योग्य ती वागणूक मिळत नसल्याची त्यांची भावना आहे. पक्षनेतृत्वाकडे गाऱ्हाणे मांडण्याचा प्रयत्न करून दखल घेतली गेली नसल्याची त्यांची तक्रार आहे. 

Edited By - Prashant Patil

loading image