esakal | गँगस्टर विकास दुबे बसला सफारीत, उलटली महिंद्रा कार; एन्काउंटरवर मोठे प्रश्नचिन्ह
sakal

बोलून बातमी शोधा

vikas dube

विकास दुबेच्या एन्काउंटरबाबत पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरून शंका उपस्थित केली जात आहे. त्यात गाडी उलटण्याच्या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, जी गाडी उलटली त्यामध्ये विकास दुबेसह काही पोलिस होते. 

गँगस्टर विकास दुबे बसला सफारीत, उलटली महिंद्रा कार; एन्काउंटरवर मोठे प्रश्नचिन्ह

sakal_logo
By
सूरज यादव

नवी दिल्ली - कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबे शुक्रवारी सकाळी पोलिस चकमकीत ठार झाला. त्याला 9 जुलैला मध्य प्रदेशातील उज्जैन इथल्या महाकाल मंदिरातून अटक कऱण्यात आली होती. उत्तर प्रदेश विशेष कृती दलाचे पथक गाडीने विकासला कानपूरमध्ये घेऊन येत होते. दरम्यान, वाटेतच गाडीचा अपघात झाला. तेव्हा विकासने पोलिसाची बंदूक घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी शऱण येण्यास सांगितले असता नकार देत विकासने पोलिसांवर गोळीबार केला. त्यानंतर झालेल्या गोळीबारात विकास ठार झाला.

दरम्यान, पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या माहितीवरून शंका उपस्थित केली जात आहे. त्यात गाडी उलटण्याच्या घटनेकडे संशयाने पाहिले जात आहे. पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की, जी गाडी उलटली त्यामध्ये विकास दुबेसह काही पोलिस होते. इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार विकास दुबे ज्या एसयुव्हीमध्ये बसला होता ती टाटा सफारी स्टॉर्म ही होती. या गाडीचा पाठलाग आजतक या वृत्तवाहिनीच्या पत्रकारांनी केला होता. याचा व्हिडिओसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. माध्यमांना पाठलाग करण्यास मज्जाव करण्यात आला. त्यानंतर जेव्हा घटनास्थळी अपघातग्रस्त गाडी होती ती महिंद्रा टीयुव्ही 300 ही होती. त्यामुळे विकास बसलेली सफारी गाडीचा अपघात झाला नव्हता तर मग पोलिस काय सांगतायत असा प्रश्न विचारला जात आहे. 

याबाबत आजतकने म्हटले की, विकास दुबेच्या गाडीचा पाठलाग केला तेव्हा तो सफारी कारमध्ये होता. याचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत. पुढे माध्यमांना काही अंतरावर अडवण्यात आले. एसटीएफने माध्यमांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. घटनास्थली गाडी उलटलेली दिसली तेव्हा पोलिसांनी याच गाडीत विकास दुबे होता असं सांगितलं. मात्र घटनास्थळापासून 20 किमी अंतरावर टोल नाक्यावरचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये विकास टाटा सफारी कारमध्ये बसलेला दिसतो. 

गाडी बदलण्यात आली का असा प्रश्न विचारला असता कानपूरचे आयजी मोहित अग्रवाल यांनी सांगितलं की, माझ्या माहितीनुसार पोलिस कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की उज्जैनमधून विकास दुबे त्याच गाडीत होता ज्याचा अपघात झाला आहे. मधेच कोणतीही गाडी बदलण्यात आलेली नाही. आयजींनी दिलेल्या उत्तरानंतर आता पुन्हा गाडीबाबत प्रश्न निर्माण होत आहे.

loading image