esakal | Chandrayaan 2 : 'चांद्रयान 2'चा आणखी एक यशस्वी टप्पा; विक्रम लॅण्डर ऑर्बिटरपासून वेगळा
sakal

बोलून बातमी शोधा

vikram lander seperated from chandrayaan 2 today

विक्रम लॅण्डर सध्या चंद्राच्या कक्षेपासून 119 किमी x 127 किमी इतक्या अंतरावर आहे. 'चांद्रयान 2' ऑर्बिटर सध्या त्याच कक्षेत फिरत असून लॅण्डर व ऑर्बिटरवर बारीक लक्ष ठेवण्याचे व नियंत्रित करण्याचे काम इस्रोच्या बंगळूर येथील केंद्रातून सुरू आहे.

Chandrayaan 2 : 'चांद्रयान 2'चा आणखी एक यशस्वी टप्पा; विक्रम लॅण्डर ऑर्बिटरपासून वेगळा

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूर : भारताच्या महत्वाकांक्षी अशा 'चांद्रयान 2'साठी आजचा (ता. 2) दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. आज दुपारी 1 वाजून 15 मिनिटांनी चांद्रयानातील विक्रम लॅण्डर आणि रोव्हर चांद्रयानापासून वेगळा झाला. चांद्रायानाच्या ऑर्बिटरपासून हा लॅण्डर वेगळा होण्यास सुरवात झाली आहे.

विक्रम लॅण्डर सध्या चंद्राच्या कक्षेपासून 119 किमी x 127 किमी इतक्या अंतरावर आहे. 'चांद्रयान 2' ऑर्बिटर सध्या त्याच कक्षेत फिरत असून लॅण्डर व ऑर्बिटरवर बारीक लक्ष ठेवण्याचे व नियंत्रित करण्याचे काम इस्रोच्या बंगळूर येथील केंद्रातून सुरू आहे. चांद्रयान 2 महिमेसाठी हा टप्पा अत्यंत महत्वाचा असून आता चंद्राकडे झेपावण्यासाठी काही दिवसच उरले आहेत. 7 सप्टेंबरला विक्रम लॅण्डर यशस्वीपणे चंद्रावर पोहोचणार आहे.

यापूर्वी 'चांद्रयान 2'ने चंद्रावरील काही भागांचे फोटो पाठविले होते. यामध्ये अपोलो क्रेटर, मरे ओरिएण्टल बेसिन, जॅक्सन, मॅच, कोरोलेव आणि मित्रा असे चंद्रावरीव भागांचे फोटो 'चांद्रयान 2'ने पाठविले होते.  

loading image
go to top