लसीकरण अधिकाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या नदीत उड्या

कारण ऐकून तुम्हीही गोंधळून जाल
लसीकरण अधिकाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या नदीत उड्या
Updated on

लखनौ: देशात कोरोना लसीकरणाची (Vaccination) मोहीम सुरू आहे. कोरोना (Coronavirus) संसर्गाचा वेग काही ठिकाणी थंडावला असला, तरी अद्याप कोरोनावर नियंत्रण मिळवणं शक्य झालेलं नाही. त्यामुळे सर्वच राज्यात लसीकरणावर भर दिला जात आहे. पण असं असतानाच उत्तर प्रदेशमध्ये एक अजब गोष्ट घडली. लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारी उत्तर प्रदेशातील एका गावात आले असताना लसीकरणापासून दूर पळणाऱ्या लोकांनी थेट नदीत उड्या घेतल्या. (Villagers Jumps into River after Seeing Health Officers for Vaccination)

लसीकरण अधिकाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या नदीत उड्या
मुंबई लोकल ट्रेन १५ जूनपर्यंत बंदच?

उत्तर प्रदेशातील सिसाउऱ्हा गावात लसीकरणाबद्दल उलटसुलट समज होते. एक दिवस आरोग्य कर्मचारी लसीकरणाची मोहिम राबवण्यासाठी रामनगर तहसीलमधील सिसाउऱ्हा गावात पोहोचले. आरोग्य कर्मचारी लस घेऊन येत आहेत हे पाहिल्यावर काही अंतरावर असलेल्या गावकऱ्यांनी थेट नदीतच उड्या घेतल्याची घटना घडली. काही लोकांनी गावात अशी अफवा पसरवली होती की लस हे एक विषारी इंजेक्शन आहे. त्यामुळे त्यापासून पळ काढणाऱ्या गावकऱ्यांनी थेट शरयू नदीत उड्या घेतल्या.

लसीकरण अधिकाऱ्यांना पाहून गावकऱ्यांच्या नदीत उड्या
सचिन वाझेचं शिवसेनेच्या अनिल परबांशी कनेक्शन?

उपविभागीय मॅजिस्ट्रेट राजीव कुमार शुक्ला यांनी या घटनेसंबंधीची माहिती दिली. शनिवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेनंतर आरोग्य कर्मचाऱ्यांनी तेथील गावकऱ्यांना लसीकरणाची गरज नीट समजावून सांगितली. त्यानंतर अखेर १८ गावकऱ्यांनी लस टोचू घेण्यास सहमती दर्शवली, असंही शुक्ला म्हणाले. दरम्यान, शनिवारपर्यंत उत्तर प्रदेशात १.६२ कोटी डोस देण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com