परराष्ट्र सचिवपदी क्वात्रा यांची नियुक्ती

विद्यमान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला हे या महिनाअखेरीस निवृत्त
vinay mohan kwatra
vinay mohan kwatra sakal

नवी दिल्ली : भारताचे नेपाळमधील राजदूत विनय मोहन क्वात्रा यांची आज देशाचे नवे परराष्ट्र सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यमान परराष्ट्र सचिव हर्षवर्धन श्रृंगला हे या महिनाअखेरीस निवृत्त होत आहेत. क्वात्रा हे भारतीय परराष्ट्र सेवेतील १९८८ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.

३० एप्रिलला ते परराष्ट्र सचिवपदाची सूत्रे स्वीकारतील. क्वात्रा यांच्या नियुक्तीला मंत्रिमंडळ निवड समितीने मंजुरी दिली आहे. नेपाळमध्ये २०२० मध्ये नियुक्ती होण्यापूर्वी क्वात्रा यांनी २०१७ ते फेब्रुवारी २०२० पर्यंत भारताचे राजदूत म्हणून काम पाहिले होते. क्वात्रा यांनी त्याआधी पंतप्रधान कार्यालयाचे सहसचिव म्हणूनही दोन वर्षे जबाबदारी सांभाळली आहे. त्यांनी अमेरिका, चीन येथेही विविध पदांवर काम केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com