esakal | तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल
sakal

बोलून बातमी शोधा

Vinod Tawde troll from netizens on Delhi Election rally

महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीतील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांनी त्यांच्या सभांची काही छायाचित्रे सोशल मिडियात शेअर केली आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या छायचित्राच्या खाली गर्दीवर अनेकांनी उपहासात्मक टिपण्या केल्या आहेत.

तावडेंचा दिल्लीत विनोद; प्रचारसभेतील 'गर्दी'वरून ट्रोल

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

नवी दिल्ली : महाराष्ट्राचे माजी शिक्षणमंत्री विनोद तावडे हे दिल्लीतील प्रचाराच्या रणधुमाळीत उतरले आहेत. त्यांनी त्यांच्या सभांची काही छायाचित्रे सोशल मिडियात शेअर केली आहेत. त्यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या छायाचित्रावरून त्यांना प्रचंड ट्रोल करण्यात येत आहे. त्यांनी पोस्ट केलेल्या छायचित्राच्या खाली गर्दीवर अनेकांनी उपहासात्मक टिपण्या केल्या आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

विनोद तावडे यांच्या फेसबुक पोस्टवरी कमेंटबॉक्समध्ये त्यांना ट्रोल करताना एकाने 'जागतिक नेतृत्व विनोदजी तावडे यांची दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी प्रचंड जाहीर सभा' असल्याची कमेंट केली आहे. तर याच्यापेक्षा जास्त संख्या (पटसंख्या) महाराष्ट्रातील पाड्यावरच्या शाळेत असेल तरी तुमच्या काळात 1300 शाळा बंद केल्या, असल्याचे एका युजरने म्हटले आहे.


INDvsNZ : तिसऱ्या टी-20 सामन्यात न्यूझीलंडची सुपर ओव्हरमध्ये बाजी

या सभेवरून महाराष्ट्रातील विरोधकांनीही टीकास्त्र सोडले आहे. तसेच दिल्लीतील आम आदमी पक्षाचे नेतेही विनोद तावडे यांच्यावर टीका करताना त्यांना ट्रोल करताना दिसत आहेत. दिल्लीतील आप नेते भागवंत मन यांनी विनोद तावडे यांच्यावर ट्विटरवरून निषाणा साधला आहे. ते म्हणाले की 'महाराष्ट्रातील १३०० शाळा बंद करणाऱ्या माजी मंत्र्यांनी दिल्लीत येऊन शिक्षणावर भाष्य करण्याची गरज नसल्याचे म्हटले आहे'.


शेरजील इमाम आपल्या राष्ट्रद्रोही भाषणात नेमका काय म्हणाला?

तत्पूर्वी, दिल्लीत आम आदमी पक्ष आणि भाजप यांच्यात निकराचा सामना होत आहे. भाजपने आपले विविध राज्यांतील नेते दिल्लीत प्रचारासाठी उतरवले आहेत. दिल्लीचा कोपरा न कोपरा हे नेते फिरत आहेत. त्यातच विनोद तावडे यांनीही या प्रचारात आपल्या परीने रंग भरले आहेत. विनोद तावडे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रिमंडळात शिक्षण मंत्री होते. मात्र, २०१९मध्ये महाराष्ट्रात झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पक्षाकडून तिकीट देण्यात आलं नव्हतं. यावरून त्यांना पक्षाकडून डावलण्यात आल्याचं बोललं जात होतं.

loading image