मुख्यमंत्री रेड्डी-चंद्राबाबूंच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; अनेक वाहनं जाळली, कलम 144 लागू I Andhra Pradesh | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Andhra Pradesh YSRCP vs TDP

दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनं जाळली आहेत.

Andhra Pradesh : मुख्यमंत्री रेड्डी-चंद्राबाबूंच्या कार्यकर्त्यांत जोरदार हाणामारी; अनेक वाहनं जाळली, कलम 144 लागू

अमरावती : आंध्र प्रदेशात (Andhra Pradesh) हिंसक परिस्थिती निर्माण झालीय. मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (Jaganmohan Reddy) यांचा पक्ष वायएसआरसीपी (YSRCP) आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांच्या टीडीपी (TDP) कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झालीय.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही बाजूंनी दगडफेक झाली असून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी अनेक वाहनंही जाळली आहेत. या घटनेत अनेक जण जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे. पलनाडू जिल्ह्यातील (Palnadu District) माचेरला शहरात एका कार्यक्रमादरम्यान झालेल्या हिंसक संघर्षात एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. यातील 10 जणांना ताब्यात घेण्यात आल्याचं पोलिसांचं (Andhra Pradesh Police) म्हणणं आहे.

पलनाडूचे एसपी वाय रविशंकर रेड्डी यांनी दिलेल्या माहितीनुसार, परिस्थिती आता नियंत्रणात असून शहरात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. हिंसाचाराची माहिती मिळताच पोलिसही मोठ्या संख्येनं घटनास्थळी पोहोचलेत. हिंसाचाराची वाढती घटना पाहून पोलिसांनी कार्यकर्त्यांवर सौम्य लाठीमार केला. या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला असून यामध्ये लोक लाठ्या घेऊन जाताना दिसत आहेत.