हिंसक जमावाने योग सत्राला केले लक्ष्य; फोडल्या अश्रुधुराच्या नळकांड्या

Violent mob targets yoga session in Maldives
Violent mob targets yoga session in MaldivesViolent mob targets yoga session in Maldives

नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मालदीवची राजधानी माले येथील योग दिनाच्या कार्यक्रमाला लक्ष्य करण्यात आले आहे. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारतीय सांस्कृतिक केंद्राने युवा व्यवहार, क्रीडा आणि सामुदायिक सक्षमीकरण मंत्रालयाच्या सहकार्याने सकाळी ०६:३० पासून योग सत्राचे आयोजन केले होते. हिंसक आंदोलकांनी (mob targets) या योगासनाला गालबोट लावून ते उधळून लावले. (Violent mob targets yoga session in Maldives)

मालदीवच्या नॅशनल फुटबॉल स्टेडियमवर हा कार्यक्रम पार पडला. संतप्त आंदोलकांनी योग सत्रात सहभागी (yoga session) झालेल्या लोकांना लवकरात लवकर स्टेडियम रिकामे करण्यास सांगितले होते. योगासनात सहभागी झालेल्या लोकांनाही जमावाकडून धमकावण्यात आले. परिस्थिती पाहता मालदीव पोलिसांनी संतप्त जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

Violent mob targets yoga session in Maldives
अग्निवीर भरतीसाठी भारतीय लष्कराकडून अधिसूचना जारी; जुलैपासून नोंदणी

स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, या प्रकरणी आतापर्यंत सहा आंदोलकांना अटक करण्यात आली आहे. मालदीवचे राष्ट्रपती इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी योग दिनाच्या सोहळ्यात झालेल्या हिंसक (mob targets) निषेधाची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. मालदीवमध्ये (Maldive) काही दिवसांपासून भारताविरोधातील निदर्शने तीव्र झाली आहेत.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, मालदीवच्या काही इस्लामिक विद्वानांचा असा विश्वास आहे की, योग करणे हे ‘सूर्य पूजन किंवा देवता म्हणून सूर्याचे प्रतिनिधित्व करणे’च्या समतुल्य आहे. अशा परिस्थितीत मालदीवच्या मुस्लिमांनी योगा करू नये आणि केवळ अल्लाहवर विश्वास ठेवावा, असे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com