
Viral Video: निवडणूक अधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्र्यांचीच अडवली गाडी अन् केली तपासणी; व्हिडिओ व्हायरल
बंगळुरु : कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यापार्श्वभूमीवर निवडणूक अधिकाऱ्यांच्या फ्लाईंग स्क्वाडनं थेट मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा ताफा जात असताना त्यांचीच गाडी अडवली आणि त्याची तपासणी केली, शुक्रवारी हा प्रकार घडला.
निवडणूक आयुक्तांनी बुधवारी कर्नाटकच्या विधानसभा निवडणुका जाहीर केल्या. त्यानंतर आदर्श आचारसंहित लागू झाली आहे. एकाच टप्प्यात इथं १० मे रोजी निवडणुका पार पडणार आहेत. तर १३ मे रोजी मतमोजणी होणार आहे.
यापार्श्वभूमीवर कर्नाटकात ठिकठिकाणी तपासणी सुरु आहे. हाच नियम पाळत निवडणूक आयोगाच्या फ्लाईंग स्क्वाडनं सर्वसामान्यांप्रमाणं मुख्यमंत्र्यांचा ताफाही अडवला तसेच खुद्द मुख्यमंत्री बोम्मई यांच्या कारचीही तपासणी केली.
हे ही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??
आयोगाच्या अधिकऱ्यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरलं झाला आहे, या व्हिडिओची नेटकऱ्यांमध्ये चर्चाही सुरु झाली.