Video : बाप रे! नारळाच्या झाडावर अजगर पाहून... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Video : बाप रे! नारळाच्या झाडावर अजगर पाहून...

Video : बाप रे! नारळाच्या झाडावर अजगर पाहून...

sakal_logo
By
टीम ईसकाळ

साप म्हटलं की सर्वांनाच धडकी भरते. सारेच साप काही विषारी नसतात, परंतु तरीही त्यांचं रुप बघून अंगावर काटा येतो. असाच एक सापाचा प्रकार म्हणजे अजगर.. एका अजगराचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. लांबलचक असं हे अजगर अतिशय आकर्षक तंत्र वापरून झाडावर चढताना हा व्हिडीओ काढला आहे. हा व्हिडिओ सुमारे पाच वर्षे जुना आहे. दक्षिण पूर्व आशियातील एखाद्या भागामधील हा व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.

व्हिडिओमध्ये दिसणारा हे जाळीदार अजगर आहे, जो जगातील सर्वात मोठ्या लांबीच्या सापांपैकी एक आहे. हा जगातील सर्वात लांब सरपटणारा प्राणी आहे ज्याची 1.5 ते 6.5 मीटर (4.9 ते 21.3 फूट) आणि वजन 75 किलो पर्यंत वाढू शकतं. अशा प्रकारची लांबी आणि वजन असणाऱ्या सापांना झाडांवर किंवा चढ्या पृष्ठभागांवर चढणे कठीण असते.

या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, ''एक भव्य अजगर एका खास पद्धतीने उंच ताडाच्या झाडावर चढत आहे. हे लांबलचक अजगर ताडाच्या झाडाला लपेटून घेत आहे नंतर त्याच्याभोवती साधारणपणे तीनदा स्वतःच्या शरिराने गुंडाळत आहे आणि नंतर डोके वर काढून पुन्हा झाडाला तीन वेटोळे घालून सफाईदारपणे वर चढत आहे. अजगराला ताडाच्या झाडावर असं तंत्रशुद्धपणे चढताना पाहून आपण मंत्रमुग्ध होऊन जातो.''

रॉयल फायथॉन्स या इंस्टा अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला असून 'जाळीदार अजगर नारळाच्या झाडावर चढत आहेत', असं कॅप्शन त्यावर दिलं आहे. या व्हिडीओला ८६ हजारांपेक्षा जास्त लाईक्स मिळाल्या असून अनेक लोकांनी कमेंट केल्या आहेत. कमेटमध्ये या अजगराला कुणी कुल, तर कुणी स्टायलिश म्हणालंय. एकंदरीतच लोकांना अजगराची ही स्टाईल फारच आवडली असल्याचं दिसत आहे.

loading image
go to top