चक्क 'या' ने रोखला वनराज चा रस्ता 

प्राजक्ता निपसे
Thursday, 23 July 2020

जंगलचा राजा वाघ आला तरीही त्यास वाट दिली नाही. कोणत्या जंगलात झाले हे प्रकरण त्यासाठी वाचाच. 

मध्यप्रदेश : जंगली प्राण्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत राहतात. मग त्यात अत्यंत वेगवान प्राण्यांनी केलेली शिकार असो किंवा मगर, सरपटणारे प्राणी सर्वांच्या व्हिडिओला तर हजारोच्या संख्येने व्ह्यूज असतात. अशातच जंगलामधील दोन शक्तिशाली  प्राणी समोरासमोर आल्यावर काय होतं हे दाखवणारे व्हिडिओलाही लाखोच्या संख्येने पाहिले जातात.

असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चर्चेत आहे. या व्हिडिओमध्ये जंगलातून जाणाऱ्या वाघाच्या रस्त्यात एक भलामोठा अजगर आडवा येताना दिसत आहे. जंगलचा राजा हा वाघ असतो. घनदाट जंगलामध्ये वाघाचीच सत्ता असते तसाच अजगरही त्याच्या प्राणघातक हल्ल्यांसाठी ओळखला जातो. हेच दोन प्राणी समोरासमोर आले तर काय होईल ? असा प्रश्न आता सर्वांनाच  पडला असेल तर त्याचे उत्तर इंडियन फॉरेस्ट ऑफिसर असणाऱ्या सुशात नंदा यांनी आपल्या ट्विटरवरुन दिलं आहे.

नंदा यांनी एक व्हिडिओ ट्विट केला आहे. या व्हिडिओमध्ये रस्त्या वरुन जाणाऱ्या वाघासमोर अजगर येतो आणि थेट त्याच्याकडे बघू लागतो असं दृष्य दिसत आहे. या व्हिडिओला कॅप्शन देताना नंदा यांनी, “अजगरासाठी वाघाने आपला रस्ता बदलला” अशी कॅप्शन दिली आहे.

हेही वाचा : कॅन्सरपासून लांब राहण्यासाठी तांब्याची भांडी वापरा 

हा व्हिडिओ कधी आणि कोणत्या व्यक्तीने काढला आहे याबद्दल नंदा यांनी कोणतीही माहिती दिलेली नाही. पण व्हिडिओमध्ये काय होतं हे पाहून अनेकांनी तो शेअर केला आहे. काही तासातच या व्हिडिओला खूप विइव्स मिळत आहे. तुम्हीही पाहा तो व्हिडीओ जेव्हा वाघ आणि अजगर समोरासमोर येतात. 

आपल्या रस्त्यात कोणी आडवे आल्यास त्याच्याशी वाद न घालता दुसरा मार्ग स्वीकारणे. असे या व्हिडिओमध्ये दाखवले आहे. हिसंक असा वाघ हि कधीतरी आपली चाल बदलताना दिसतो.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Video Tiger Leaves The Way To Python