Sat, April 1, 2023

YS Jagan Mohan Reddy : विशाखापट्टनम असणार आंध्र प्रदेशची नवी राजधानी; मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
Published on : 31 January 2023, 8:12 am
विशाखापट्टनम आंध्र प्रदेशची नवीन राजधानी असणार आहे. आंध्र प्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांनी ही घोषणा केली आहे. या सोबतच त्यांनी नवीन राजधानीत ग्लोबल इन्वेस्टर समिटचे आयोजन करणार असल्याची घोषणा देखील केली.
रेड्डी म्हणाले की मी तुम्हाला विशाखापट्टनम येथे निमंत्रित करतो, जी येत्या काळात राज्याची राजधानी असणार आहे. मी देखील येत्या काही महिन्यांत विशाखापट्टनम येथे शिफ्ट होतो आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले.