Shraddha Murder Case: आणखी एक श्रद्धा! वर्षभर बंद घरात नवऱ्याने ठेवले बायकोच्या शरीराचे तुकडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Shraddha Murder Case: आणखी एक श्रद्धा! वर्षभर बंद घरात नवऱ्याने ठेवले बायकोच्या शरीराचे तुकडे

Visakhapatnam: दिल्लीतील श्रद्धा वालकर हत्येनंतर संपूर्ण देशात हळहळ व्यक्त केली जात आहे. याहत्येमध्ये आरोपी आफताबच्या निर्दयीपणाचीदेखील खूप चर्चा केली जात आहे. या धक्कादायक घटनेनंतर अवघा देश हादरून गेला आहे. तपासात अनेक धक्कादायक खुलासे केले जात आहेत. ही घटना ताजी असतानाच अशीच एक घटना समोर आली आहे.

हेही वाचा- First Paralympic Winner : मुरलीकांत पेटकर सांगतायत अपंग खेळाडूंसमोरील आव्हाने

आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथे एका बंद घरात ठेवलेल्या ड्रममध्ये महिलेच्या शरीराच्या अनेक भागांचे तुकडे सापडले आहेत. वर्षभराहून अधिक काळ हा मृतदेह तेथे पडून असल्याचा पोलिसांना संशय आहे. भाडेकरूने भाडे न दिल्याने घराच्या मालकाने दरवाजा तोडला असता महिलेचे शरीराचे अवयव आढळून आले.

हेही वाचा: PM Modi : मोदींना थोरल्या भावाचा सल्ला, आता त्यांनी...; वाचा काय म्हणाले सोमभाऊ

विशाखापट्टणम शहर पोलिस आयुक्त श्रीकांत यांनी सांगित की ही घटना विशाखापट्टणम मधील मदुरवदा मधील आहे. तेथील एका घर मालकाने एका भाडेकरूला राहण्यासाठी त्याचे घर दिले होते. मात्र जून 2021 मध्ये, भाडेकरूने पत्नीच्या गर्भधारणेचे कारण देत थकबाकी न भरता घर सोडले. अनेक दिवस तो न आल्याने घर मालकाने घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला.

महिलेचा मृतदेह आढळला त्यानंतर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी ड्रममधील काही भाग ताब्यात घेतले आहेत. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक पुराव्यावरून असे दिसून येते की, आता सापडलेल्या मृतदेहाचे एक वर्षापूर्वी तुकडे करण्यात आले असावेत. आम्हाला संशय आहे की, ही त्याची पत्नी असावी. मालकाने तक्रार दिली असून, त्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Madhya Pradeshpolicecrime