मुखर्जींपाठोपाठ रघुराम राजन यांनाही संघाचे आमंत्रण

वृत्तसंस्था
बुधवार, 30 मे 2018

माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने नुकतेच एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही रा. स्व. संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

नवी दिल्ली - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना राष्ट्रीय स्वंयसेवक संघाने नुकतेच एका कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे. त्यानंतर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनाही रा. स्व. संघाची शाखा असलेल्या विश्व हिंदू परिषदेने सप्टेंबरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या विश्व हिंदू काँग्रेसमध्ये सहभागी होण्यासाठी आमंत्रण दिले आहे.

रघुराम राजन यांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे आयोजकांना आशा आहे की, रघुराम राजन या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतात. असे विश्व हिंदू काँग्रेसच्या आयोजकांचे म्हणणे आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर असताना त्यांनी संघाच्या धोरणांवर टीका केली होती. रघुराम राजन यांना गव्हर्नर म्हणून दुसरी टर्म घ्यायची इच्छा असल्याचे बोलले जात होते. मात्र, भाजप सरकारने त्यांच्या या प्रस्तावात रस दाखवला नव्हता. यामुळे राजन यांना विहिंपने निमंत्रित करणे हे आश्चर्यचकित करणारे आहे. 

रघुराम राजन यांना विश्व हिंदू काँग्रेसच्या वर्ल्ड इकॉनॉमिक कॉन्फरन्समध्ये बोलण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. १२५ वर्षांपूर्वी शिकागोमध्ये स्वामी विवेकानंद यांनी विश्व धर्म संसदेत ऐतिहासिक भाषण दिले होते. स्वामी विवेकानंद यांच्या या ऐतिहासिक भाषणाची आठवण ठेवण्यासाठी या विश्व हिंदू काँग्रेसने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात आर्थिक, शैक्षणिक, माध्यम आणि राजकीय क्षेत्रातील अनेक मोठ्या व्यक्तींचा समावेश असणार आहे.

Web Title: Vishwa Hindu Parishad Invites Raghuram Rajan After Mukherjee Invites By Rss