भारताला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी पैसा कुठून पाठवला जात होता, माहिती आली समोर

काही संस्था निधी उभारणीचं काम तर काही आयटी सेलचं कामकाज पाहतात.
Islamic Nation
Islamic Nationesakal
Summary

काही संस्था निधी उभारणीचं काम तर काही आयटी सेलचं कामकाज पाहतात.

दरभंगा : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (Popular Front of India) व्हिजन डॉक्युमेंटमध्ये (Vision Document) भारताला इस्लामिक राष्ट्र (Islamic Nation) बनवण्याचं ध्येय होतं. आता त्यांना निधी कुठून मिळत होता, हेही तपासात समोर आलंय.

मिथिलांचलमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या (PFI) वेगवेगळ्या नावानं अर्धा डझन उप-संस्था कार्यरत आहेत. या संस्था विद्यार्थी, महिला, बेरोजगार तरुण, वृद्ध, व्यापारी अशा वेगवेगळ्या नावानं काम करतात. काही संस्था निधी उभारणीचं काम तर काही आयटी सेलचं कामकाज पाहतात. मदरसा-मस्जिदमध्ये पत्रिका वाटणं आणि जनजागृती मोहीम राबविणाऱ्या ह्या संस्था आहेत. तपासात ही माहिती समोर आल्यानंतर, या संस्थांच्या कुंडलीची छाननी केली जात आहे.

Islamic Nation
महाराष्ट्रानंतर 'ते' बंगालला टार्गेट करतील; ममता बॅनर्जींनी भाजपला स्पष्टच सुनावलं

मिथिलांचलमध्ये महिला आणि विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र उप-संस्था आहेत. कायदेशीर मदतीसाठीही एक संस्था काम करते. निधी उभारण्याची जबाबदारी संस्थेची असते. चर्चासत्र, आंदोलनात जमवाजमव, समस्यांचं निराकरण, आयटी क्षेत्रासाठीही वेगवेगळ्या संघटना आहेत. यासोबतच गेल्या विधानसभा निवडणुकीपासून सोशल डेमोक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया (SDPI) या राजकीय शाखेच्या हालचालीही सातत्यानं वाढल्या आहेत. कोणत्या उपसंस्थेकडून कोणतं काम करुन घ्यायचं हे पीएफआयचे अध्यक्ष ठरवतात. जिल्ह्यात आतापर्यंत झालेल्या तपासात ही बाब समोर आलीय.

Islamic Nation
'आईचं दूध कुणी बाजारात नेवून विकत असेल तर..'; मानेंविरोधात शिवसैनिक आक्रमक

संस्थांना अनेक राज्यांतून निधी

रेहाब फाउंडेशन ऑफ इंडियाच्या (Rehab Foundation of India) माध्यमातून निधी उभारणी केली जाते. पूर्वी हा निधी केरळमधून यायचा. यानंतर झारखंड, यूपी, बंगाल, बिहारमधून निधी येऊ लागला. संस्थेला स्थानिक पातळीवरून निधीही दिला जातो. पीएफआयचे राज्य सरचिटणीस दरभंगा यांच्या सिंहवाडा पोलीस स्टेशन क्षेत्रातील शंकरपूर येथील रहिवासी असलेल्या सलाउल्लाह याच्या घरावर 3 डिसेंबर 2020 रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) छाप्यानं हे उघड झालं. सनाउल्ला फुलवारीशरीफशी संबंधित प्रकरणात सहाव्या क्रमांकावर आरोपी आहे.

पीएफआय आपलं ध्येय कसं साध्य करेल?

पीएफआयचे आठ पानांचे व्हिजन डॉक्युमेंट तपास यंत्रणेकडं सोपवण्यात आलंय. यामध्ये पीएफआय आपलं ध्येय कसं साध्य करेल आणि त्यात कोणत्या प्रकारचं काम केलं जाईल याची तपशीलवार माहितीय. त्यामुळं तपास यंत्रणांनी याची गांभीर्यानं दखल घेतलीय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दरभंगा आणि मधुबनी येथील डझनभराहून अधिक लोकांच्या कुंडल्या तपासल्या जात आहेत. याची माहितीही संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आलीय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com