
नवी दिल्ली : देशातील पंधरा राज्यांतील ५७ राज्यसभेच्या जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सहा जागांचा समावेश असणार आहे. राज्यातील संजय राऊत, प्रफुल्ल पटेल, पी. चिदंबरम, विनय सहस्त्रबुद्धे, पीयूष गोयल, विकास महात्मे यांचा राज्यसभेतील कार्यकाळ संपणार आहे. दरम्यान, या निवडणुकीसाठी ३१ मे ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असून १० जूनला मतदान होणार आहे. (Voting for six Rajya Sabha seats in Maharashtra on June 10 Curiosity for sixth place)
महाराष्ट्रातून सध्या राज्यसभेवर शिवसेनेकडून संजय राऊत, राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल, काँग्रेसकडून पी. चिदंबरम तर भाजपकडून पीयूष गोयल, विनय सहस्त्रबुद्धे आणि विकास महात्मे हे सहा खासदार असून ते आता निवृत्त होत आहेत. सध्याचं विधानसभेचं संख्याबळ पाहिलं तर महाविकास आघाडीचे तीन खासदार निवडून येण्यास काही अडचण नसेल. पण भाजपला तिसरा उमेदवार निवडणून आणण्यासाठी मतं कमी पडत आहेत. तर महाविकास आघाडीकडं काही मतं अतिरिक्त आहेत. त्यामुळं सहाव्या जागेवर कोण निवडून येईल याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन आपण अपक्ष निवडणूक लढण्यास इच्छुक असल्याचं म्हटलं आहे. पण त्यांना राज्यसभेची निवडणूक लढवण्यासाठी १० आमदारांचं अनुमोदन लागतं, पण त्यांना पाठिंबा मिळतो का ते पहावं लगेल. पण जर बिनविरोध निवडणूक न होता प्रत्यक्ष निवडणुकीची वेळ आली तर ती निवडणूक १० मे रोजी पार पडेल, असा अंदाज आहे.
यामध्ये शिवसेनेकडून राऊत, राष्ट्रवादीकडून पटेल तर पी. चिंदबरम यांना तामिळनाडूमधून डीएमकेच्या सहकार्यानं निवडून आणलं जाऊ शकतं. पण काँग्रेसचा राज्यसभेतील महाराष्ट्राचा उमेदवार कोण असेल याची उत्सुकता आहे. तसेच पियूष गोयल हे स्वतः केंद्रीय मंत्री आहेत त्यामुळं ते पुन्हा राज्यसभेवर निवडून येऊ शकतात तर विनय सहस्त्रबुद्धेंना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, असंही सांगण्यात येत आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.