esakal | चालत घरी पोहचले पण घरचे म्हणाले जा आगोदर...
sakal

बोलून बातमी शोधा

Madhya Pradesh

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील इंदरगड येथे काही मजूर कोरोनाच्या भितीमुळे चालत आपल्या गावी पोहचले. पण, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरात येण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले.

चालत घरी पोहचले पण घरचे म्हणाले जा आगोदर...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

भोपाळ : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊनची घोषणा केली असताना, मजूर चालत आपल्या घरापर्यंत पोहचत आहेत. पण, मध्य प्रदेशात चालत घरी पोहचलेल्यांना आगोदर कोरोनाची चाचणी करून या मगच घरात या असे सांगितल्याने ना घर का ना घाट का अशी अवस्था झाली आहे.

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यातील इंदरगड येथे काही मजूर कोरोनाच्या भितीमुळे चालत आपल्या गावी पोहचले. पण, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना घरात येण्यापूर्वी कोरोनाची चाचणी करण्यास सांगितले. पण, इंदरगड येथील रुग्णालयात याची चाचणी होत नसल्याने या सर्व मजुरांचे नमुने दतियाला पाठविण्यात आले आहेत. 

देशभरात कोरोनामुळे भितीचे वातावरण आहे. शहरातील नागरिकांनी घरात लॉकडाऊन करून घेतले आहे. तर, मजुरांचे हाल होत असल्याने ते मिळेल त्या मार्गाने गावाकडे परतत आहेत. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातील मजुरांची संख्या सर्वाधिक असल्याने हाल होताना दिसत  आहेत. त्यातच आता घरी पोहचल्यानंतर कुटुंबियांकडून अशी वागणूक मिळत असल्याने निराशेचे वातावरण आहे. जयपूर, हैदराबाद, दिल्लीमध्ये काम करणाऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे.

loading image