
नवी दिल्ली : महत्त्वाकांक्षी वक्फ दुरुस्ती विधेयक बुधवारी (ता. २ एप्रिल) लोकसभेत मंजुरीसाठी मांडले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, या विधेयकाच्या विरोधात मुस्लिम संघटनांचे आंदोलन सुरू आहे. तर, वक्फ मालमत्तेवर अतिक्रमण करणारे प्रभावी लोक या विरोधामागे असल्याचा दावा सरकारतर्फे करण्यात आला आहे.