
नवी दिल्ली : वक्फ दुरुस्ती विधेयकावरून आज राज्यसभेमध्येही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार घमासान झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. ‘‘हे विधेयक घटनाविरोधी असून ते भाजपसाठी ध्रुवीकरणाचे साधन बनले आहे,’’ असा आरोप राज्यसभेत वक्फ विधेयकावरील चर्चेची सुरुवात करताना काँग्रेसने केला. सत्ताधारी पक्षाकडून त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. हे विधेयक कुणा एका पक्षाच्या बाजूचे नाही तर देशाच्या हिताचे असल्याचे भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी सांगितले.