Abhinandan Vardhaman | वॉर हिरो अभिनंदनला 'वीरचक्र', राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वॉर हिरो अभिनंदनला 'वीरचक्र', राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

वॉर हिरो अभिनंदनला 'वीरचक्र', राष्ट्रपतींच्या हस्ते झाला सन्मान

sakal_logo
By
ओमकार वाबळे

भारतीय हवाई दलातील प्रमुख पायलट आणि ग्रुप कॅप्टन अभिनंदन वर्धमान यांना सोमवारी एका समारंभात राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते वीरचक्र प्रदान करण्यात आले आहे. वर्धमान यांना नुकतीच ग्रुप कॅप्टन या पदावर बढती देण्यात आली. बालाकोट हवाई हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच 27 फेब्रुवारीला अभिनंदन यांनी पाकिस्तानी एफ-16 लढाऊ विमान पाडले.

या दरम्यान त्यांनी पाकव्याप्त काश्मीरवरून उड्डाण केले आणि त्याचे मिग-21 कोसळल्याने त्यांना इमर्जन्सी लँडिंग करावं लागलं. यानंतर त्यांना पाकिस्तानी लष्कराने ताब्यात घेतलं. या प्रकरणामध्ये आंतरराष्ट्रीय पाळीवरील हस्तक्षेपासह भारताच्या बाजूने मोठ्या प्रमाणावर दबाव आणल्यामुळे पाकिस्तानी लष्कराला त्यांची सुटका करावी लागली.

अभिनंदन श्रीनगरस्थित 51 स्क्वॉड्रनचा भाग होता आणि 27 फेब्रुवारी 2019 रोजी पाकिस्तानी हवाई दलाने सुरू केलेला हवाई हल्ला हाणून पाडण्यासाठी त्याने उड्डाण केलं होतं. भारताने जैश-ए-द्वारा चालवल्या जाणाऱ्या खैबर पख्तूनख्वा भागातील पाकिस्तानच्या दहशतवादी तळावर हवाई हल्ला केला होता. त्यामध्ये अभिनंदनला तत्काळ लँडिंग करावं लागलं होतं.

loading image
go to top