
अयोध्या दौरा : राज ठाकरेंना आता भोजपुरी गाण्यातून इशारा!
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या प्रस्तावित अयोध्या दौऱ्यावरुन आता वातावरण तापायला लागलं आहे. भाजपचे खासदार ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठाकरेंना उत्तर भारतीयांची माफी मागितल्याशिवाय उत्तर प्रदेशात पाऊल ठेऊ देणार नाही, असा इशारा दिला होता. त्यानंतर आता राज ठाकरेंना गाण्यातून इशारा देण्यात आला आहे. हे गाण सोशल मीडियावर व्हायरल झालं आहे. (warning to Raj Thackeray from Bhojpuri song over Ayodhya tour appeal to apologize)
"कदम नही रखने देंगे, ये नेताजीने ठाना है, माफी मांगो राज ठाकरे अगर अयोध्या आना है" असे या गाण्याचे बोल असून ते टिपिकल भोजपुरी स्टाईलमध्ये रेकॉर्ड करण्यात आलं आहे. महेश निर्मोही नामक गायकानं हे गाणं गायलं असून योगेश दास शास्त्री यानं ते लिहिलं आहे. तर बब्बन आणि विष्णू यांनी या गाण्याला संगीत दिलं आहे. तसेच या गाण्याबरोबर जे थंबनेल वापरण्यात आलं आहे, त्यावर राज ठाकरे, ब्रृजभूषण शरण सिंह यांचा फोटो आणि गीतकाराचा फोटो आहे.
हेही वाचा: ओबीसी आरक्षण: आदर्श उत्तरासाठी तिन्ही सरकारांचे प्रयत्न आवश्यक - नरके
त्यामुळं आता राज ठाकरे यांचा अयोध्या दोरा चांगलाच तापणार असल्याचं चित्र निर्माण झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून भोंगा आणि हिंदुत्वाचा मुद्दा राज ठाकरेंनी लावून धरल्यानं महाराष्ट्रात त्यांची भूमिका ही विरोधी पक्ष असलेल्या भाजपसाठी अनुकूल मानली जात आहे. पण अयोध्या दौऱ्यावरून उत्तर प्रदेशातील भाजप खासदारानं राज ठाकरेंना उत्तर प्रदेशात पाऊल न ठेवण्याचा थेट इशाराच दिला आहे.
हेही वाचा: यूपीत मदरशांमध्ये राष्ट्रगीत अनिवार्य; योगी सरकारचा मोठा निर्णय
विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी यावरुन उत्तर प्रदेशातील भाजप नेत्यांना राज ठाकरेंना अयोध्येत येण्यापासून रोखण्यात येऊ नये, असं आवाहनही केलं होतं. पण तरीही भाजपचे नेते आणखीनच आक्रमक झाले असून आता तर ब्रृजभूषण शरण सिंह यांनी राज ठकरेंना माफी मागितली तरी अयोध्येत येऊ देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे.
Web Title: Warning To Raj Thackeray From Bhojpuri Song Over Ayodhya Tour Appeal To Apologize
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..