esakal | "मृतदेह जाळले जात आहेत अन् यांना रक्ताचा सुगंध येतोय"
sakal

बोलून बातमी शोधा

"मृतदेह जाळले जात आहेत अन् यांना रक्ताचा सुगंध येतोय"

"मृतदेह जाळले जात आहेत अन् यांना रक्ताचा सुगंध येतोय"

sakal_logo
By
नामदेव कुंभार

हैदराबाद : भारतामधील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला केंद्रातील मोदी सरकारच जबाबदार असल्याची टीका एआयएमआयएम (ऑल इंडिया माजलीस-ए-इत्तेहदुल मुस्लिमीन)प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. देशात कोरोना महामारी आटोक्यात न येण्याची जबाबदारी फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांची आहे. गतवर्षी लोकांना थाळी आणि टाळ्या वाजवायला सांगितल्या होत्या. त्यामुळे कोरोना पळून गेला का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थिीत केला.

देशातील रुग्णालयात आरोग्य सुविधा का वाढवल्या नाहीत? तेव्हा केंद्र सरकार झोपलं होतं का? राजधानी दिल्लीमध्ये ऑक्सिजनचा तुडवडा का आहे? जर आपण आत्मनिर्भर आहोत, तर साऊदी अरब आणि रशीयासारख्या देशांकडून मद का घेतली जाते? , असे खासदार ओवेसी म्हणाले.

कोरोनामुळे मत्यू झालेल्यांना दफन केलं जात आहे, मृतदेह जाळले जात आहेत. आणि यांना (मोदी सरकारला) रक्ताची सुगंध येतोय. मोदी सरकार अदृश्य झालं आहे, असा हल्लाबोल ओवेसी यांनी केला आहे. जर आमच्याकडे खासदार निधी असता तर लोकांना ऑक्सिजन अथवा गोळ्या-औषधे दिली असती, पण आमच्याकडे सध्या काहीच नाही, असेही ओवेसी म्हणाले.

loading image