तेजस्वी यादव यांचा क्रिकेटचा ‘डाव’

सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल; जिंकण्यासाठीच खेळण्याचा दिला संदेश
watch tejashwi yadav spotted playing cricket says one should always play to win
watch tejashwi yadav spotted playing cricket says one should always play to winsakal

पाटणा : एरवी राजकीय मैदानात डाव-प्रतिडाव करणारे राष्ट्रीय जनता दलाचे नेते, बिहार विधानसभेचे विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांचा क्रिकेट खेळतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. ट्विटरवर त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. यादव राजकारणाबाबत फारसे गंभीर नसल्याचा टोमणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यादव यांना मारला होता. मैदानावर क्रिकेट खेळून यादव यांनी तो टोमणा खरा असल्याचे दाखविण्याचे मनावर घेतले आहे का, अशा शब्दांत नेटिझन्सनी त्यांच्या क्रिकेट खेळण्यावर आश्चर्य व्यक्त केले. या व्हिडिओमध्ये टी शर्ट आणि हापचड्डीच्या वेशात तेजस्वी यादव फलंदाजी करताना तसेच मध्यम गतीने गोलंदाजी करताना दिसतात.

क्रिकेटपटू म्हणून त्यांचे कौशल्य पाहून अनेक नेटिझन्सनीही त्यांचे कौतुक केले. आयपीएलमध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्सबरोबर करार करणाऱ्या यादव यांचे क्रिकेटमधील कौशल्य आश्चर्यचकित करण्यासारखे नाही. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारचा दौरा केल्यापासून यादव उष्मांक घटविण्याचा प्रयत्न करत आहेत, असेही म्हटले जात आहे. बिहारमधील कार्यक्रमात पंतप्रधान मोदी यांनी यादव यांना वजन घटविण्याचा सल्ला दिल्याचीही अफवा पसरली होती. त्यानंतर, आपल्या वडिलांच्या वयाच्या असलेल्या पंतप्रधानांच्या या टिप्पणीमुळे यादव वजन कमी करण्यासाठी घाम गाळत असल्याचा मतप्रवाहही प्रसारमाध्यमांत आहे. खरे तर राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी क्रिकेटमध्ये कारकीर्द घडविण्याची तेजस्वी यादव यांची इच्छा होती. मात्र, प्रत्यक्षात त्यांना क्रिकेटचे मैदान सोडून राजकीय मैदानात प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध ‘डाव’ लढवावे लागत आहेत.

अनेक वर्षांनंतर क्रिकेट खेळण्याचा आनंद आजमावतोय. अशावेळी चालक, आचारी, माळी आदी तुमचे सहकारी खेळाडू असतात. ते तुम्हाला बाद करण्यासाठी उत्सुक असतात. जीवन असो की खेळ, एखाद्याने नेहमी जिंकण्यासाठी खेळायला हवे. तुम्ही तुमच्या डोक्यात जेवढे नियोजन कराल तेवढी तुमची कामगिरी चांगली होईल.

- तेजस्वी यादव, नेते, राजद

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com