
जलप्रलयानंतर तपोवन ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी बचाव यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असताना येथील पाण्याची पातळी आज पुन्हा वाढल्याने या मोहिमेला काहीकाळ ब्रेक लागला होता.
बचाव कार्यात व्यत्यय, निमलष्करी दलांना ड्रिलिंगचा आधार
डेहराडून - जलप्रलयानंतर तपोवन ऊर्जा प्रकल्पाच्या बोगद्यामध्ये अडकून पडलेल्या कामगारांच्या सुटकेसाठी बचाव यंत्रणा अहोरात्र मेहनत घेत असताना येथील पाण्याची पातळी आज पुन्हा वाढल्याने या मोहिमेला काहीकाळ ब्रेक लागला होता. पाणी कमी होताच ही मोहीम पूर्ववत सुरू झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान दुर्घटनेत मरण पावलेल्यांची संख्या ३० वर पोचली असून अद्याप १७० जण बेपत्ता आहेत.
- ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
मागील पाच दिवसांपासून बचाव पथके येथे शोध मोहीम राबवीत आहेत. रैणी गाव आणि श्रीनगर येथील डॅमच्या परिसरामध्ये देखील शोध मोहीम राबविली जात आहे. धौली गंगा पाण्याच्या पातळीमध्ये आज अचानक वाढ झाली. या बोगद्यातील राडारोडा बाहेर यावा म्हणून बचाव पथकांनी ड्रिलिंगचा आधार घेतला होता पण अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने येथील काम तात्पुरते थांबविण्यात आले होते, असे चमोलीच्या जिल्हाधिकारी स्वाती.एस. भादुरिया यांनी सांगितले.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
राज्यपालांना विरोध
तपोवन ऊर्जा प्रकल्पाला भेट देणाऱ्या उत्तराखंडच्या राज्यपाल बेबी राणी मौर्य यांना आज बेपत्ता कामगारांच्या नातेवाइकांच्या रोषास सामोरे जावे लागले. राज्यपालांनी यावेळी त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला पण आश्वासनावर त्यांचे समाधान झाले नाही. यावेळी काहीजणांनी सरकारविरोधात घोषणाबाजी देखील केली.
Edited By - Prashant Patil