पाकला उत्तर देण्यास आम्ही सक्षम : हवाईदलप्रमुख धानोआ

वृत्तसंस्था
मंगळवार, 20 ऑगस्ट 2019

भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागामध्ये हवाईदल दक्ष असून, पाकिस्तानच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी सांगितले. 

नवी दिल्ली : भारत-पाकिस्तान सीमावर्ती भागामध्ये हवाईदल दक्ष असून, पाकिस्तानच्या कुरापतींना तोंड देण्यासाठी आम्ही सक्षम आहोत, असे हवाईदलप्रमुख एअरचीफ मार्शल बी. एस. धानोआ यांनी सांगितले. 

भारत आणि पाकिस्तान द्विपक्षीय संबंधांमधील तणाव शिगेला पोचला असताना लष्करप्रमुखांपाठोपाठ आता हवाईदलप्रमुखांनीही आज पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावले. सीमेवर शत्रूंची हालचाल असो किंवा नसो, हवाईदल मात्र नेहमीच सावध असते. पुरूलियामध्ये घडला तसा प्रकार पुन्हा घडू नये, म्हणून नागरी हवाई वाहतूक करणाऱ्या विमानांवरदेखील बारकाईने लक्ष ठेवून असतो, असेही धानोआ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: We are Strong to answer Pakistan says B S Dhanoa