
उत्तराखंडमध्ये लागू होणार समान नागरी कायदा, मुख्यमंत्री धामींची मोठी घोषणा
देहरादून : उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होताच मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी (CM Pushkar Singh Dhami) यांनी दुसऱ्याच दिवशी मोठी घोषणा केली आहे. संपूर्ण उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा (Uniform Civil Code) लागू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. या निर्णयाला राज्य मंत्रिमंडळाने संमती दिल्याचीही माहिती त्यांनी दिली. यावर लवकरच तज्ज्ञांची एक टीम तयार केली जाईल आणि राज्यभर समान नागरी कायदा लागू केला जाईल, असे धामी यांनी यावेळी सांगितले. (Uniform Civil Code In Uttarakhand )
हेही वाचा: ''भाजपने विवेक अग्निहोत्रींना यूट्यूबवर द काश्मीर फाइल्स अपलोड करण्यास सांगावे''
विधानसभा निवडणुकीत भाजपच्या दणदणीत विजयानंतर पुष्कर सिंह धामी यांची विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड करण्यात आली होती. धामी यांनी बुधवारी (दि. 23) मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे गुरुवारी (दि. 24) मुख्यमंत्रीपदावर विराजमान होताच त्यांनी जनतेला दिलेले सर्वात मोठे आश्वासन पूर्ण केले आहे. उत्तराखंड विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने 70 पैकी 47 जागा जिंकल्या होत्या. धामी यांच्या घोषणेनंतर उत्तराखंड (Uttarakhand) हे देशातील पहिले राज्य आहे जे समान नागरी संहिता लागू करणार आहे.
Web Title: We Decided To Implement Uniform Civil Code In Uttarakhand Says Cm Pushkar Singh Dhami
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..