भारताकडे ड्रोन हल्ल्याला उत्तर द्यायची टेक्नोलॉजी नाही - राहुल पंडित

"सरकार झोपलं होतं. या धोक्याबद्दल माहिती देऊनही सरकारने मागच्या काही महिन्यात काहीच केलं नाही"
Drone Camera
Drone CameraSakal

नवी दिल्ली: जम्मूमधील IAF च्या तळावर झालेला ड्रोन हल्ला (dorne attack) आणि भविष्यात त्याचे काय धोके आहेत, या बद्दल लेखक आणि पत्रकार राहुल पंडित यांनी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले आहेत. "ड्रोनच्या माध्यमातून पाकिस्तानातून ड्रग्ज, (drugs) शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जम्मूमध्ये पोहोचवला जात होता. सुरक्षेच्या दृष्टीने हा गंभीर विषय होता. पण सरकार झोपलं होतं. या धोक्याबद्दल माहिती देऊनही सरकारने मागच्या काही महिन्यात काहीच केलं नाही" असं राहुल पंडित (Rahul Pandita) यांनी म्हटलं आहे. (we do not have any technology to counter drone Rahul Pandita)

राहुल पंडित यांनी 'लव्हर बॉय ऑफ बहावलपूर' हे पुस्तक लिहिलं असून त्यात पुलवामा केसचे धागेदोरे तपास यंत्रणांनी कसे शोधून काढले, त्याची सविस्तर माहिती आहे. २०१९ मध्ये पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

Drone Camera
TMC ने जिवंतपणी मारलं, मृत्यूच्या प्रमाणपत्रासाठी शिक्षकाला फोन

राहुल पंडित हे काश्मिरी पंडित असून १९९० च्या दशकात तिथे दहशतवाद वाढल्यानंतर ते कुटुंबासोबत खोऱ्यातून निघून गेले होते. काश्मीरमधला एक प्रखर आवाज म्हणून ते ओळखले जातात. "आतापर्यंत ड्रोनचा वापर फक्त शस्त्रास्त्र आणि ड्रग्ज पोहोचवण्यासाठी केला जायचा. पण आता पाकिस्तानकडे पेलोडसह हे ड्रोन उडवण्याची टेक्नोलॉजी आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात ते नुकसान घडवून आणू शकतात. या धोक्याचा सामना नेमका कसा करायचा? त्याचे तंत्रज्ञान सध्या भारताकडे उपलब्ध नाहीय" असा दावा राहुल पंडित यांनी केला. ते 'द प्रिंट'शी बोलत होते.

Drone Camera
कुत्र्याच्या मृत्यूनंतर पती-पत्नीने संपवलं जीवन, नालासोपाऱ्यातील घटना

"गंभीर चिंता वाढवणारी बाब ही आहे की, पाकिस्तानकडे आता पेलोडला घेऊन ड्रोनचे संचालन करण्याची क्षमता आहे. ही ड्रोन्स ते आता, त्यांना जिथे स्ट्राइक करायचा आहे, अशा कुठल्याही लष्करी तळ किंवा नागरी भागामध्ये घेऊन येऊ शकतात. सध्या तरी आपल्याकडे अशा प्रकारचा हल्ला थोपवण्याचे कुठलेही तंत्रज्ञान नाहीय" असे राहुल पंडित यांनी म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com