Independence Day : 70 वर्षात जे काम झाले नाही ते 10 दिवसात करुन दाखवले- पंतप्रधान मोदी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑगस्ट 2019

७३ व्या  स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले असल्याचे आज (ता.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी भर दिला.

स्वातंत्र्यदिन
नवी दिल्ली : ७३ व्या  स्वातंत्र्यदिनी लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना ७० वर्षात जे काम झाले नाही ते १० दिवसात केले असल्याचे आज (ता.15) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. देशाच्या संरक्षणाच्या मुद्यावरही त्यांनी यावेळी भर दिला. तिन्ही संरक्षण दल देशाचा अभिमान आहे. देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिने तिन्ही दलांमध्ये समन्वयाची गरज आहे. त्यासाठी एका महत्वाच्या निर्णयाची घोषणा करत आहे. चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ यांची नियुक्ती सरकार करणार आहे. त्यामुळे संरक्षण दले अधिक सक्षम होतील, असे पंतप्रधानांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेली ही घोषणा मोठी आहे. देशाच्या तिन्ही दलांमध्ये समन्वयासाठी आता 'चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ' ची नेमकणूक सरकार करणार आहे. या पदावरील व्यक्ती तिन्ही दलांचे नेतृत्व करेल, असे मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून दहशतवादावर भाष्य केले. दहशतवाद पोसणाऱ्यांचा भारताकडून पर्दाफाश होत आहे. आज केवळ भारतच नाही तर श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्तान या देशांनाही दहशतवादाचा सामना करावा लागत आहे. आम्ही दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांविरोधात लढत आहोत.

कलम ३७० बद्दल बोलताना मोदी म्हणाले, अनेकांनी कलम ३७० रद्द करण्यासाठी पाठिंबा दिला. परंतु काही लोक राजकारण करण्यासाठी याला विरोध करत आहेत. कलम ३७०, कलम ३५ ए रद्द केल्याने जर राज्याच भाग्य बदलणार होते, तर गेल्या अनेक वर्षांपासून बहुमत असून ते ताटकळत का ठेवलं. माझ्यासाठी देशाचं हितच सर्वकाही.

मोदींची फेट्याची परंपरा यावर्षीही कायम


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we removed the Article 370 which was not done in last 70 years, said PM Modi