प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रुपये देऊ : चंद्राबाबू

पीटीआय
रविवार, 7 एप्रिल 2019

राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी दोन लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्‍वासन देणारा निवडणूक जाहीरनामा आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने आज जाहीर केला. 

अमरावती (आंध्र प्रदेश) : राज्यातील प्रत्येक कुटुंबाला दर वर्षी दोन लाख रुपयांपर्यंतचे फायदे देण्याचे आश्‍वासन देणारा निवडणूक जाहीरनामा आंध्र प्रदेशमधील सत्ताधारी तेलुगू देसम पक्षाने आज जाहीर केला. 

गर्भापासून ते मृत्यूपर्यंत थेट फायदे देण्याचा दावा करणारा जाहीरनामा पक्षाचे अध्यक्ष आणि राज्याचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी प्रसिद्ध केला. ते म्हणाले, की कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गरीब कुटुंबांना दर वर्षी 72 हजार रुपये देण्याचे आश्‍वासन दिले आहे. मात्र, आम्ही सत्तेत आल्यास प्रत्येक कुटुंबाला दोन लाख रुपयांचे फायदे देऊ. इतका फायदा देण्याचा विचार इतर पक्ष स्वप्नातही विचार करू शकत नाही. केंद्राची पंतप्रधान किसान योजना सुरू ठेवतानाच तितकीच मदत राज्य सरकारकडून देण्याचे आश्‍वासनही नायडू यांनी या वेळी दिले. 

विशेष म्हणजे, राज्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या वायएसआर कॉंग्रेसनेही आज जाहीरनामा प्रसिद्ध करत तेलुगू देसमने देऊ केलेल्या फायद्याइतकाच फायदा देण्याचे आश्‍वासन दिले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: we will give 2 lakhs rupees to each family says Chandrababu Naidu