
आसाम, मिझोरामला चक्रीवादळाचा फटका
गुवाहाटी/ एजोल : आसाममध्ये चक्रीवादळ आणि मुसळधार पावसामुळे हाहा:कार उडाला. या पावसाचा आणि चक्रीवादळाचा सुमारे लाखांच्या आसपास नागरिकांना फटका बसला आहे. गेल्या तीन दिवसांत आसाममधील २२ जिल्ह्यात किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच मिझोरामच्या कोलासिब आणि मामित जिल्ह्यांत मुसळधार पाऊस आणि चक्रीवादळामुळे एका चर्चच्या इमारतीसह २०० हून घरांची हानी झाली आहे.
मिझोरामधील या दोन जिल्ह्यांत शनिवारी रात्री चक्रीवादळाने धडक दिली. कोलासिब जिल्ह्यात सुमारे २२० घरांची पडझड झाली आणि एका चर्चचे नुकसान झाले आहे. तसेच आसाम सीमेलगत असलेल्या मामित जिल्ह्यात १८ घरांची हानी झाली. आसाममध्ये देखील चक्रीवादळ आणि वीज पडण्याच्या घटना घडल्या आहेत. यात तीन दिवसांत किमान २० जणांचा मृत्यू झाला आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे मुख्य कार्यकारी अधिकारी जी.डी. त्रिपाठी यांनी म्हटले की, तीन दिवसांत म्हणजे १४ एप्रिल ते १७ एप्रिल या काळात २२ जिल्ह्यात १४१० गावात ८० महसूल मंडळात चक्रीवादळाने नुकसान झाले आहे. ९५ हजार २३९ नागरिकांना फटका बसला आहे. यादरम्यान वीज पडल्याने २० जणांचा मृत्यू झाला आहे. यात मार्चचा शेवटचा आठवडा ते १७ एप्रिलपर्यंत १९ जणांचा मृत्यू झाला आहे. या चक्रीवादळात ३०११ घरांची हानी झाली आहे.
Web Title: Weather Update Cyclone Hits Assam Mizoram 20 Killed In 22 Districts
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..