उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट
-

उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट

मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाने धुमाकूळ घातला आहे. केरळमध्ये भूस्खलानसह महापूराची स्थिती निर्माण झाली आहे. याशिवाय दिल्लीतही तुरळक पाऊस पडला. भारताच्या हवामान विभागाने हलक्या आणि मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. याशिवाय उत्तराखंडमध्ये रेड अलर्ट दिला आहे. याशिवाय उत्तर प्रदेशातील काही भाग आणि पंजाबच्या काही भागामध्ये ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. उत्तर भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरयाणा, पंजाब आणि हिमाचल प्रदेशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.

उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, राज्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर योग्य खबरदारी घेण्यात आली आहे. राज्यातील ज्या भागात पावसाचा फटका बसतो तिथे यंत्रणा सज्ज करण्यात आली आहे. राज्यात १८ ऑक्टोबरला रेड अलर्ट देण्यात आला असून १७ ते १९ ऑक्टोबर या कालावधीत यलो अलर्ट देण्यात आला आहे.

महाराष्ट्रातसुद्धा ११ जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. यामध्ये नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अहमदनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्याचा समावेश आहे. सकाळपासून राज्यातील काही भागात पावसाने हजेरी लावली आहे. दरम्यान, पुढच्या २४ तासात राज्यातील काही ठिकाणी मेघ गर्जनेसह पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

उत्तराखंड, केरळमध्ये मुसळधार; महाराष्ट्रातील ११ जिल्ह्यांना 'यलो' अलर्ट
सिद्धूंचा काँग्रेसवर लेटरबॉम्ब! सोनिया गांधींना चार पानी पत्र

केरळमध्ये पावसाने थैमान घातलं असून राज्यात एनडीआरएफची पथके तैनात करण्यात आली आहेत. आतापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला असून ८ जण बेपत्ता असल्याची माहिती मिळते. इडुक्की आणि कोट्टायमसह पठानमथिट्टा या पर्वतीय भागांमध्ये पुराचा फटका बसला आहे.

हवामान विभागाने राज्यातील ११ जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट जारी केला आहे. तिरुवनंतरपुरम, कोल्लम, पथानमथिट्टा, कोट्टायम, अलाप्पुझा, एर्नाकुलम, इडुक्की, त्रिशूर, पलक्कड, मलप्पुरम आणि कोझीकोड जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com