Weather Update : उकाड्यापासून मिळणार दिलासा! 'या' 16 राज्यांत कोसळणार दमदार पाऊस

पुढील 5 दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहेत.
Rainfall Alert
Rainfall Alertesakal
Summary

हरियाणा, पंजाब, बिहार, आग्नेय उत्तर प्रदेश, आग्नेय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.

Weather Update : राष्ट्रीय राजधानी दिल्ली आणि त्याच्या लगतच्या भागात हवामान बदललं आहे. कडाक्याच्या उन्हात वातावरण आल्हाददायक झालंय.

शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळं नागरिकांना उन्हापासून काहीसा दिलासा मिळालाय. तर, आज ढगाळ वातावरण असून दिल्लीच्या काही भागात हलका पाऊस पडू शकतो.

भारतीय हवामान खात्यानं म्हटलंय, पुढील 5 दिवस देशातील बहुतांश भागात उष्णतेपासून दिलासा मिळण्याची शक्यता आहेत. स्कायमेटच्या अंदाजानुसार, 'पूर्व आसाम आणि अरुणाचल प्रदेशात आज हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सिक्कीम, ईशान्य भारताचा उर्वरित भाग, पश्चिम बंगाल, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, तेलंगणा, तामिळनाडू आणि केरळमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडू शकतो.'

Rainfall Alert
Ramadan Eid : जीव देईन, पण देशाचे तुकडे कधीच होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचा भाजपला इशारा

बिहारमधील 31 जिल्ह्यांत आज पाऊस

पश्चिम हिमालय, हरियाणा, पंजाब, बिहार, आग्नेय उत्तर प्रदेश, आग्नेय मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. दुसरीकडं, बिहारमध्ये आयएमडीनं पुढील चार दिवस वेगवेगळ्या ठिकाणी पाऊस सुरू राहण्याची शक्यता वर्तवलीये. आज (रविवार) पाटणासह राज्यातील 31 जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.

Rainfall Alert
Muslim Reservation : मुस्लिमांचं चार टक्के आरक्षण का रद्द केलं? अमित शहांनी सांगितलं 'कारण'

दक्षिण भारताच्या काही भागांत मान्सूनपूर्व पाऊस

स्कायमेट हवामान अहवालानुसार, गेल्या 2 ते 3 दिवसांपासून उत्तर, मध्य, पूर्व, ईशान्य आणि दक्षिण भारताच्या काही भागांमध्ये मान्सूनपूर्व पाऊस पडत आहे. 27 एप्रिलपर्यंत देशाच्या पूर्व भागात तर, 28 एप्रिलपासून कर्नाटक, महाराष्ट्र, गुजरातचा काही भाग, दक्षिण राजस्थान आणि मध्य प्रदेशच्या पश्चिम भागात पाऊस सुरू होऊ शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com