Weather Updates: मे महिन्यातही सूर्य आग ओकणार! पावसासंदर्भातही मोठी अपडेट; IMD ने काय सांगितलं?

Weather Updates Maharashtra: मे महिन्यात देशभरात तापमान चढेच राहील असं सांगण्यात आलं आहे.
IMD Weather Updates
IMD Weather Updates

नवी दिल्ली- देशात उष्णतेने कहर केला आहे. लोकांना आकाशातून कोणी आग ओकत असल्यासारखा अनुभव येत आहे. दिवसा घराच्या बाहेर निघणं देखील कठीण झालं आहे. त्यात भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मे महिन्यातील स्थितीचा अंदाज व्यक्त केला असून तो फारसा दिलासादायक नाही. मे महिन्यात देशभरात तापमान चढेच राहील असं सांगण्यात आलं आहे. (Weather Updates IMD)

आएमडीने बुधवारी इशारा जारी केला आहे. उत्तर भारतातील लोकांना भट्टीमध्ये असल्यासारखा अनुभव येणार आहे. उत्तर भारतातील अनेक भागात मे महिन्यामध्ये तापमान साधारणपेक्षा अधिक राहील. विशेषत: पुढील चार दिवस तापमान जास्त असणार आहे. महाराष्ट्रातील काही भागात देखील उष्णतेची लाट येणार आहे. आयएमडी प्रमुख मृत्यूजंय महापात्र यांनी यासंदर्भातील माहिती दिली आहे. (Director General IMD Mrutyunjay Mohapatra)

IMD Weather Updates
Dhule Summer Heat : वाढत्या पाऱ्याने धुळेकर बेजार! 43 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान; शहरातील रस्ते, बाजारात शुकशुकाट

मे महिन्यामध्ये महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि गुजरातमध्ये ५ ते ८ दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता आहे. पुढील काही दिवस तापमान साधारणपेक्षा जास्तच असणार आहे. कोकणातील काही भागात उष्णतेची लाट आणि दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये रात्री तापमानामध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. एकंदरीत राज्यातील तापमान जास्त राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पावसासंदर्भात अंदाज

आयएमडी प्रमुखांनी सांगितलं की, मे महिन्यामध्ये हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. उत्तर पश्चिम भारतातील अनेक भाग, मध्य भारताचे काही भाग, नॉर्थ ईस्ट भारतात पासवाची स्थिती सामान्य ते जास्त असण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेश, विदर्भ, तेलंगणा आणि तमिळनाडूमध्ये देखील अशीच स्थिती राहण्याची शक्यता आहे. येथे सामान्य ते जास्त पाऊस पडण्याची शक्यता आहे.

IMD Weather Updates
Solapur Weather Update : यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वात उष्ण दिवस; ४ मेपर्यंत राहणार उच्चांकी तापमान

पूर्व भारतात उष्णतेचा उच्चांक

पूर्व आणि उत्तर पूर्व भारतामध्ये एप्रिल महिन्यामध्ये सरासरी २८.१२ डिग्री सेल्सियस तापमान राहिले, जे १९०१ नंतर सर्वाधिक होते. दुसरीकडे, उत्तर प्रदेश हरियाणा, चंडीगड,दिल्ली, पंजाब राजस्थानमध्ये चार ते सहा मे दरम्यान पाऊस आणि वादळी वाऱ्याची शक्यता आहे. यूपी, बिहार , हरियाणा, चंदीगड आणि दिल्लीमध्ये वेगवान वारे पाहायला मिळतील असं आयएमडीने सांगितलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com