Wedding Season : देशात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख लग्नं, इतक्या कोटींची होणार उलाढाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Wedding

Wedding Season : देशात 14 डिसेंबरपर्यंत होणार 32 लाख लग्नं, इतक्या कोटींची होणार उलाढाल

Wedding Expense in this Wedding Season : दसरा दिवाळीनंतर आता देशभरात लग्न सोहळ्यांचे वेध लागले आहेत. 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबर दरम्यान हा लग्नसराईचा हंगाम असून, या काळात देशभरात 32 लाख नागरिक बोहल्यावर चढणार आहे. एवढेच नव्हे तर, या काळात 3.75 लाख कोटींची उलाढाल होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या वर्षी या काळत देशभरात सुमारे 25 लाख विवाह सोहळे पार पडले होते, तर, 3 लाख कोटींपेक्षा अधिकची उलाढाल झाली होती.

CAIT रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीने केलेल्या सर्वेक्षणातून ही आकडेवारी समोर आली आहे. 50,000 लग्नांवर 1 कोटींहून अधिक खर्च येणार आहे. तर 10 लाख लग्नांसाठी 10 लाखांचा खर्च होतील असा अंदाज CAIT ने व्यक्त केला आहे, शिवाय 5 लाख लग्नांसाठी 25 लाख रुपये खर्च केले जातील. दुसरीकडे 50,000 लग्नांसाठी 50 लाख रुपये आणि उर्वरित 50,000 लग्नांसाठी 1 कोटी किंवा त्याहून अधिक रक्कम खर्च केली जाण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

CAIT नेमकं काय म्हटलंय?

कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बीसी भरतिया आणि राष्ट्रीय सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, या हंगामात एकट्या दिल्लीत 3.50 लाखांपेक्षा जास्त विवाहसोहळे पार पडण्याची अपेक्षा आहे. ज्यात 75 हजार कोटींची उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

कॅटच्या रिसर्च शाखेने केले सर्वेक्षण

लग्न सोहळे आणि त्यांच्यावर होणाऱ्या खर्चाच्या रक्कमेबाबत देण्यात आलेला हा अहवाल CAIT च्या रिसर्च शाखेने केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आला आहे. CAIT ने अलीकडेच देशातील काही शहरांमध्ये व्यापारी आणि सेवा पुरवठादारांचे सर्वेक्षण केले. ज्यात लग्न सराईच्या मोसमात लग्न खरेदीतून सुमारे 3..75 लाख कोटी रुपयांची उलाढाल होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. 4 नोव्हेंबर ते 14 डिसेंबरमध्ये लग्न सोहळ्यांचा पहिला टप्पा पार पडणार आहे. त्यानंतर याचा पुढचा सीझन 14 जानेवारी 2023 पासून सुरू होऊन जुलैपर्यंत असणार आहे.