टोलनाक्याजवळ राहणाऱ्यांना मिळणार पास; गडकरींची लोकसभेत माहिती

वाहनांमध्ये 6 एअरबॅग असणे बंधनकारक केल्याचेही यावेळी गडकरींनी सांगितले.
Nitin Gadkari
Nitin Gadkari Sakal

नवी दिल्ली : टोल प्लाझाजवळ राहणार्‍या नागरिकांना पास देण्याचा प्रस्ताव विचारधीन असल्याची माहिती केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी (NItin Gadkari) यांनी लोकसभेत दिली आहे. यावेळी त्यांनी 60 किलोमीटरच्या आत एकच टोलनाका असेल असे सांगत या अंतरात जर दुसरा टोल प्लाझा असेल तर, तो पुढील 3 महिन्यांत बंद केला जाईल, असेदेखील गडकरी लोकसभेत स्पष्ट केले. ( NItin Gadkari On Toll Plaza In Loksabaha)

म्हणून अमेरिका समृद्ध

यावेळी गडकरी म्हणाले की, भारताला समृद्ध करण्यासाठी, डिसेंबर 24 पूर्वी भारतातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेसारख्या (America Infrastructure) असतील. या संदर्भात त्यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉन एफ. केनेडी यांच्या प्रसिद्ध कोटाचा संदर्भ देत सांगितले की, "अमेरिकन रस्ते चांगले नाहीत कारण अमेरिका समृद्ध आहे, परंतु अमेरिका समृद्ध आहे कारण अमेरिकन रस्ते चांगले आहेत".

सहा एअरबॅग बंधनकारक

गडकरी पुढे बोलताना म्हणाले की, रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने 8 प्रवासी घेऊन जाणाऱ्या प्रत्येक वाहनांमध्ये 6 एअरबॅग (AirBag) असणे बंधनकारक केले आहे. या निर्णयानंतर वाहन उद्योगाने खर्च वाढल्याची तक्रार केली आहे. परंतु गरीब ग्राहकांच्या जीवावर आम्ही श्रीमंतांचे संरक्षण करणार नसल्याचे गडकरी यांनी यावेळी स्पष्ट केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com