West Bengal : कूचबिहारमध्ये वाहनाला विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal :  कूचबिहारमध्ये वाहनाला विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

West Bengal : कूचबिहारमध्ये वाहनाला विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

West Bengal Cooch Bihar : पश्चिम बंगालमधील कूचबिहारमध्ये एका वाहनाला विजेचा धक्का लागून 10 जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत, अशी माहिती अतिरिक्त एसपी, माथाभंगा यांनी दिली आहे. रविवारी रात्री उशिरा हा अपघात झाला असून, अपघातातील 27 जखमींपैकी 16 जणांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांना जलपाईगुडी रुग्णालयात पाठवण्यात आले.

माथाभंगा यांनी सांगितले की, मेखलीगंज पोलीस ठाण्याचे धारला ब्रिजवर रविवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास जल्पेशकडे जाणाऱ्या प्रवासी वाहनाला पुलावर विजेचा धक्का बसला. यात 10 जणांचा मृत्यू झाला तर, काहीजण जखमी झाले आहेत. गाडीत विद्युत प्रवाह जनरेटर यंत्रणेमुळे आला असावा असा प्राथमिक तपासातून समोर आले आहे.

हेही वाचा: Sanjay Raut Arrest: ८ वाजताचा भोंगा...राऊतांच्या अटकेनंतर CM शिंदेंची प्रतिक्रिया

दरम्यान, अपघातातील सर्व प्रवासी सीताकुची पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी असून त्यांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे. घटनेनंतर वाहन चालक फरार झाला असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

Web Title: West Bengal 10 People Died Others Injured Due To Vehicle Got Electrocute

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top