पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

west bengal

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना काही हिंसाचाराच्या घटनाही राज्यात घडत आहेत. 

पश्चिम बंगाल : बॉम्बस्फोटात भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी

कोलकाता - पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली असून राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करत असताना काही हिंसाचाराच्या घटनाही राज्यात घडत आहेत. दक्षिण परगना जिल्ह्यातील एका गावात बॉम्ब स्फोट झाल्याचं समोर आलं आहे. यामध्ये भाजपचे 6 कार्यकर्ते जखमी झाले असून हल्ल्यामागे तृणमूल काँग्रेसचा हात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. 

दक्षिण 24 परगना जिल्ह्यातील रामपूर गावात बॉम्बस्फोटाची घटना घडली. भाजपच्या कार्यकर्त्यांनी आरोप केला की, शुक्रवारी रात्री उशिरा ते एका लग्न समारंभातून परत येते होते. त्यावेळी त्यांच्यावर गावठी बॉम्बचा हल्ला झाला. तृणमूलक्चाय कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर गावठी बॉम्ब फेकले आणि स्फोट झाला असा आरोप त्यांनी केला. यामध्ये सहाजण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

राज्यात निवडणुकांची तयारी सुरु असून राजकीय संघर्ष, आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. या वातावरणात हिंसाचाराच्या घटना घडत असल्यानं चिंता वाढली आहे. गेल्या आठवड्यात उत्तर 24 परगना जिल्ह्यातही अशीच घटना घडली होती. यामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यावर तृणमूलच्या तीन कार्यकर्त्यांनी घरात घुसून हल्ला केल्याचा आरोप होता. भाजपने यावरून तृणमूल काँग्रेसवर निशाणा साधताना कोलकात्यात वृद्ध महिलांचे पोस्टर लावले होते. त्यात म्हटलं होतं की, या बंगालच्या मुली नाहीत का?

हे वाचा - Corona Vaccine सर्टिफिकेटवरील मोदींचा फोटो हटवा, निवडणूक आयोगाचा आदेश

पश्चिम बंगालमध्ये 17 फेब्रुवारीला मंत्री जाकिर हुसैन यांच्यावर बॉम्ब हल्ला झाला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. त्यांच्यावर मुर्शिदाबादमधील निमिटटा रेल्वे स्टेशनच्या परिसरात हल्ला झाला होता. यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं होतं की, हा एक कटाचा भाग होता आणि काही लोकांवर पक्षात प्रवेशासाठी दबाव टाकला जात आहे. तसंच हा हल्ला रेल्वे स्टेशन परिसरात झाला यामुळे केंद्रानं उत्तर द्यावं. 

Web Title: West Bengal 6 Bjp Workers Injured Crude Bomb Blast

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top