बंगालमध्ये मोदी लोकप्रिय नेते तर ममतांविरोधात लाट; प्रशांत किशोर यांची ऑडिओ क्लिप लीक

4prashant_20kishor_1.jpg
4prashant_20kishor_1.jpg

कोलकाता- West Bengal Assembly Election 2021 पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्यातील मतदानापूर्वी भाजपने तृणमूल काँग्रेसचे निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची एक ऑडिओ क्लिप लीक केली आहे. यामध्ये क्लबहाऊस ऍपवर निवडक पत्रकारांशी चर्चा करताना ते म्हणत आहेत की, राज्यात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एक समान लोकप्रिय आहेत. भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी ही ऑडिओ क्लिप लीक केली आहे. राज्यात सत्ताधाऱ्यांविरोधात लाट असून 50 टक्क्यांहून अधिक हिंदू मोदींमुळे भाजपला मतदान करतील, असेही प्रशांत किशोर म्हणत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावर ही ऑडिओ क्लिप लीक व्हायरल झाल्यानंतर प्रशांत किशोर यांनी आपली भूमिका मांडली आहे. ऑडिओचा निवडक भाग लीक करण्याऐवजी भाजपने संपूर्ण ऑडिओ टाकायला हवा, असे त्यांनी म्हटले आहे. 

व्हायरल ऑडिओ क्लिपवर प्रशांत किशोर म्हणाले की, मला आनंद आहे की, भाजपचे लोक माझ्या क्लबहाऊस चॅटला आपल्या नेत्यांच्या भाषणापेक्षा अधिक महत्त्व देत आहेत. आमच्या चॅटचा हा एक अत्यंत छोटा हिस्सा आहे. त्यांनी माझ्या ऑडिओ क्लिपचा संपूर्ण भाग प्रसारित करावा, असे माझे त्यांना आवाहन आहे, असेही त्यांनी म्हटले. 

अमित मालवीय यांनी एकापाठोपाठ एक असे सलग चार टि्वट केले. मालवीय यांनी आपल्या टि्वटमध्ये म्हटले की, क्लबहाऊसमधील एका सार्वजनिक गप्पांमध्ये ममता बॅनर्जी यांचे निवडणूक रणनीतीकार यांचे म्हणणे आहे की, टीएमसीच्या अंतर्गत सर्वेक्षणात भाजपचा विजय होत आहे. मतदान मोदींसाठी आहे, ध्रुवीकरण एक वास्तविकता आहे. बंगालमधील 27 टक्के लोकसंख्या मतुआ समाज भाजपला मतदान करत आहे. भाजपकडे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत. 

मालवीय यांनी पुढच्या टि्वटमध्ये म्हटले की, ममता बॅनर्जींच्या निवडणूक रणनीतीकाराचे म्हणणे आहे  की, डावे, काँग्रेस आणि टीएमसीने मागील 20 वर्षांत मुसलमानांचे तुष्टीकरण केले आहे. त्यामुळे जमिनीवर आक्रोश आहे आणि हिंदूंचे ध्रुवीकरण होत आहे. बोलणाऱ्यांना त्यांच्या गप्पा सार्वजनिक होत आहेत, याची जाणीव नव्हती. 

मालवीय यांनी आणखी एक चॅटबाबत बोलताना म्हटले की, मोदी बंगालमध्ये खूप लोकप्रिय आहेत आणि यात कसलीच शंका नाही. देशभरात त्यांचे फॉलोअर्स आहेत. प्रशांत किशोर यांनी म्हटले आहेकी, टीएमसीविरोधात अँटी-इनकम्बन्सी आहे. ध्रुवीकरण एक वास्तविकता आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या चॅटवरुन भाजपकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. भाजप नेते राजीव बॅनर्जी म्हणाले की, ज्या दिवशी प्रशांत किशोर यांनी टि्वट केले होते की, भाजप 3 अंकी आकड्यांपर्यंतही पोहोचणार नाही. प्रशांत किशोर यांच्या ऑडिओ क्लिपवरुन हे स्पष्ट होतंय की, ते अपयशी ठरले आहेत. बंगालमध्ये रणनीतीकाराची रणनीतीच चालणार नाही. भाजप नेते लॉकेट चॅटर्जी यांनी ही यावर प्रतिक्रिया दिली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com