व्हील चेअरवरुन ममतादीदी प्रचाराच्या मैदानात; दुखापतीनंतर पहिलीच रॅली

mamta banarjee
mamta banarjee

कोलकाता- पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज कोलकाताच्या गांधी मूर्ती ते हाजरापर्यंत व्हील चेअरवरुन रोड शो केला. नंदीग्राममध्ये एका कथित हल्ल्यात ममता बॅनर्जी यांना दुखापत झाली. त्यानंतर त्या पहिल्यांदाच एका कार्यक्रमात सहभागी झाल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमधील बेडमधूनही निवडणुकीच्या प्रचारात लवकरात लवकर परत येण्याची आशा व्यक्त केली होती. त्यानंतर त्या आज मैदानात उतरल्या आहेत. ममता यांच्या रॅलीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. शिवाय ममतांसोबत तृणमूल काँग्रेसचे अनेक नेतेही उपस्थित होते. एएनआय आय वृत्तसंस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चपासून विधानसभेच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. भाजपने ममतादीदींसमोर कडवे आव्हान उभे केले आहे. 

ममता बॅनर्जी यांनी हॉस्पिटलमधून आपल्या समर्थकांसाठी एक व्हिडिओ जारी केला होता. त्यात त्या म्हणाल्या होत्या की, 'येत्या दोन ते तीन दिवसात मी प्रचारात सामिल होण्याची आशा आहे. जखम कायम राहू शकते, पण तरीही मी मॅनेज करेन. मी कोणतीही मीटिंग ड्रॉप करणार नाही. मला काही दिवस व्हिलचेअरची मदत घेण्याची आवश्यकता पडू शकते. मला तुमचा पाठिंबा हवा आहे.' 

नंदीग्राम मतदारसंघातून ममता बॅनर्जी निवडणूक लढवत आहेl. त्यांच्याविरोधात त्यांचे जुने सोबती आणि सध्या भाजपवासी झालेले सुवेंद्र अधिकारी निवडणूक लढवत आहेत. ममतांनी ट्विट करत म्हटलं होतं, '2007 मध्ये आजच्याच दिवशी निर्दोष नंदीग्रामच्या गावकऱ्यांवर गोळीबार करण्यात आला होता. अनेकांचा मृतदेहही सापडला नव्हता. हा राज्याच्या इतिहासाचा काळा अध्याय होता. जीव गमावणाऱ्यांना श्रद्धांजली.' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com