esakal | ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदासंघ सोडला, नंदीग्राममधून लढवणार निवडणूक

बोलून बातमी शोधा

1Mamata_20Banerjee_0.jpg}

ममता बॅनर्जींनी कोलकातातील भवानीपूर मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे. 2011 मधील पोटनिवडणुकीत येथे एकूण मतदानापैकी 77.6 टक्के मते मिळवली होती.

ममता बॅनर्जींनी भवानीपूर मतदासंघ सोडला, नंदीग्राममधून लढवणार निवडणूक
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

कोलकाता-  West Bengal Assembly Election 2021 तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. ममता बॅनर्जींनी 291 उमेदवारांची यादी जाहीर केली असून यात 51 महिला उमेदवार तर 42 मुस्लिम उमेदवारांचा समावेश आहे. त्याचबरोबर दलित समाजातील 79 उमेदवारांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जींनी आपल्या परंपरागत भवानीपूर मतदारसंघाऐवजी नंदीग्राममधून निवडणूक लढणार असल्याचे जाहीर केले आहे. मला जनतेचा आशीर्वाद हवा आहे. माझ्यावर विश्वास ठेवा. फक्त तृणमूल काँग्रेसच बंगालचा विकास करु शकतो. बंगालला देशातले आघाडीचे राज्य बनवायचे आहे. मागील 10 वर्षांपासून आपण खूप मेहनत घेतली आहे. कोरोना आणि अम्फान वादळाला आपण सामोरे गेले आहोत. आपण चांगले काम केले आहे, असे वक्तव्य ममता बॅनर्जींनी उमेदवारी जाहीर करताना म्हटले आहे. 

त्या पुढे म्हणाल्या की, आम्ही कला, क्रीडा, मीडिया आणि सांस्कृतिक क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींना उमेदवारी दिली आहे. तृणमूलच्या 23-24 विद्यमान आमदारांना वय आणि इतर कारणांमुळे यंदा निवडणुकीच्या रिंगणात उभा केलेले नाही. 

हेही वाचा- Gold Rate: लग्नसराईच्या आधी सोनं 42500 पर्यंत येण्याची शक्यता, 5 कारणांमुळे होतेय दरात घसरण

ममता बॅनर्जींनी कोलकातातील भवानीपूर मतदारसंघातून दोन वेळा निवडणूक लढवलेली आहे. 2011 मधील पोटनिवडणुकीत येथे एकूण मतदानापैकी 77.6 टक्के मते मिळवली होती. त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा 50 हजारांहून अधिक मतांनी विजय मिळवला होता. नंतर 2016 च्या निवडणुकीत त्यांच्या मतांची टक्केवारी कमी झाली होती. गेल्यावेळी त्यांना फक्त 48 टक्के मते मिळाली. त्या नेहमी स्थानिक आणि बाहेरचा नागरिक असा वाद घालत असतात. यामुळे मतदारसंघात त्यांचा जनाधार घटत असल्याचे बोलले जाते. विशेष म्हणजे या मतदारसंघातील 70 टक्क्यांहून अधिक मतदार हे बिगर-बंगाली विशेषतः गुजराती आहेत. त्याचबरोबर ममता बॅनर्जींनी बंगालमध्ये गुजरातचे लोक राज्य करणार नाहीत, असे वारंवार सांगताना दिसतात.