esakal | 'साडीत पाय दिसणं बरं नव्हे'; ममतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरण
sakal

बोलून बातमी शोधा

mamata

काल बुधवारी प्रचारादरम्यान पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या साडीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं.

'साडीत पाय दिसणं बरं नव्हे'; ममतांबद्दल केलेल्या वक्तव्यावर भाजप नेत्यानं दिलं स्पष्टीकरण

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

कोलकाता : देशात सध्या पाच राज्याच्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. यामध्ये सर्वाधिक चर्चा पश्चिम बंगाल विधानसभेची आहे. कारण याठिकाणी आपली सत्ता प्रस्थापित व्हावी, यासाठी भाजप पक्षाने आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. पश्चिम बंगाल काबिज करण्यासाठी पंतप्रधान मोदींनी तसेच आणि गृहमंत्री अमित शहा यांनी कंबर कसली आहे, त्यामुळे ही विधानसभा निवडणूक आधिकच रंजक होत आहे. दरम्यान काल बुधवारी प्रचारादरम्यान पश्चिम बंगालचे भाजप अध्यक्ष दिलीप घोष यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या साडीवरुन वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. घोष यांनी नाव न घेता टीका केली असली तरी त्याचा संबंध ममता बॅनर्जी यांच्या नावाशी असल्याचं स्पष्ट समजत आहे. दिलीप घोष यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नेटकऱ्यांनी नाराजीचा सूर ओढला आहे. मात्र, आता त्यांनी आपल्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिलं आहे. 

त्यांनी याबाबतचं स्पष्टीकरण देताना म्हटलंय की, त्या आपल्या मुख्यमंत्री आहेत. आम्ही त्यांच्याकडून बंगालच्या संस्कृतीशी अनुरुप अशा कार्याची अपेक्षा करतो. महिलांनी साडीमध्ये पाय दाखवणे योग्य नाहीये. लोक याबाबत आक्षेप घेत बोलत आहेत. मलाही हे आक्षेपार्ह वाटलं म्हणूनच मी त्याबद्दल बोललो. पश्चिम बंगालचे भाजप प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष पुरुलियामधील प्रचारसभेत बोलताना म्हटलं होतं की,  'प्लास्टर काढल्यानंतर देखील त्या बँडेज लावलेला पाय दाखवत आहेत, त्यांनी साडी नेसली आहे आणि एक पाय झाकलेला आहे पण दुसरा नाही. अशी साडी कुणी नेसलेलं मी आजपर्यंत पाहिलेलं नाही. जर त्यांना त्यांचा पाय दाखवायचाच असेल, तर त्यांनी बर्मुडा घालावा. त्यामुळे अधिक व्यवस्थित दिसू शकेल.' दिलीप घोष यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल झाला आहे. 

हेही वाचा - ममता बॅनर्जींनी साडी नेसण्याऐवजी बर्मुडा घालावा, भाजप नेत्याची जीभ घसरली, TMC नं दिलं उत्तर

अध्यक्ष दिलीप घोष यांच्या या वक्तव्यावरुन बंगालमधील राजकीय वर्तुळात वाद निर्माण झाला आहे. तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यासह अनेकांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे. महुआ यांनी ट्विट करत भाजपवर निशाणा साधला आहे. ट्विटमध्ये त्यांनी म्हटलेय की,  “भाजपाचे प्रदेशाध्यक्ष जाहीर सभेमध्ये विचारतात की ममता दीदी साडी का नेसतात? त्यांनी बर्मुडा घातला पाहिजे, म्हणजे त्यांचा पाय व्यवस्थित दिसेल. आणि या माकडांना वाटतं की ते बंगालमध्ये जिंकतील?”