esakal | इतकं तर मी मुख्यमंत्र्यांसाठीही करत नाही; चिडलेल्या नुसरत जहाँचा VIDEO भाजपने केला शेअर
sakal

बोलून बातमी शोधा

nusrat jahan

सध्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार आणि स्टार प्रचारक नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये निवडणूक प्रचारावेळी त्यांना राग आल्याचं दिसत आहे.

इतकं तर मी मुख्यमंत्र्यांसाठीही करत नाही; चिडलेल्या नुसरत जहाँचा VIDEO भाजपने केला शेअर

sakal_logo
By
टीम ई सकाळ

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा (West Bengal Assembly Election 2021) निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाले आहे. यानंतर सर्वच राजकीय पक्षांनी आता त्यांच्या प्रचारसभांचा जोर आणखी वाढवला आहे. विरोधकांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले जात असून टीका करण्याची एकही संधी सोडली जात नाहीय. सध्या तृणमूल काँग्रेसच्या (TMC) खासदार आणि स्टार प्रचारक नुसरत जहाँ (Nusrat Jahan) यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये निवडणूक प्रचारावेळी त्यांना राग आल्याचं दिसत आहे. यावरून आता भाजपने नुसतर जहाँ यांच्यावर टीका केली आहे. 

पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यातील मतदानाआधी नुसरत जहाँ एका रोड शोमध्ये सहभागी झाल्या होत्या. प्रचारावेळी अचानक त्यांना राग आला. व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमद्ये दिसतं की, गाडीवर उभा असलेल्या नुसरत जहाँ म्हणतात की, एक तासापेक्षा जास्त वेळ प्रचार करत आहे. एवढं तर मी मुख्यमंत्र्यांसाठीसुद्धा करत नाही. यानंतर रागाने त्या गाडीतून खाली उतरतात. सध्या सोशल मीडियावर हा व्हायरल होत आहे. 

नुसरत जहाँ यांचा 25 सेकंदाचा व्हिडीओ पश्चिम बंगाल भाजपने शेअर केला आहे. यावर Mamata Losing Nandigram असा हॅशटॅगही वापरला आहे. व्हिडीओमध्ये नुसतर जहाँ यांच्या रागानंतर तृणमूलचे नेते त्यांना आणखी थोडं चालण्याची विनंती करताना दिसतात. हा व्हिडीओ कधीचा आणि कोणत्या ठिकाणचा आहे हे मात्र स्पष्ट झालेलं नाही. 

हे वाचा - Holi 2021 - पंतप्रधान मोदींसह कमला हॅरिस यांनी भारतीयांना दिल्या होळीच्या शुभेच्छा

पश्चिम बंगालमध्ये 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पाडलं. दुसऱ्या टप्प्यातील मतदान एक एप्रिलला होणार असून यामध्ये नंदीग्रामचा समावेश आहे. याठिकाणी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि सुवेंदु अधिकारी यांच्यात लढत होणार आहे. स्टार प्रचारकांसह सर्वच पक्षांच्या नेत्यांनी आपल्या उमेदवारासाठी कंबर कसली आहे.

loading image