esakal | West Bengal - पोलिंग बुथवर भाजप-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले; VIDEO व्हायरल

बोलून बातमी शोधा

West Bengal - पोलिंग बुथवर भाजप-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

West Bengal - पोलिंग बुथवर भाजप-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्यातील मदतान प्रक्रियेला सोमवारी सुरुवात झाली. यामध्ये मालदा, कोलकाता दक्षिण, मुर्शिदाबाद, पश्चिम वर्धमान आणि दक्षिण दिनाजपूर जिल्ह्यातील मतदारसंघांचा समावेश आहे. जवळपास 86 लाख 78 हजार 221 मतदार या जिल्ह्यांत आहेत.

मालदा जिल्ह्यातील रौता मतदारसंघात एका पोलिंग बुथवर त्या भागातील मतदार नसल्याचा आरोप करत तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या पोलिंग एजंटला धक्काबुक्की केल्याची घटना घडली. तृणमूलने म्हटलं की, तो याठिकाणचा मतदार नाही. त्यामुळे इथून निघून जा अशी विनंती केली होती. कोणीही धमकी दिली नाही. यावर भाजपच्या पोलिंग एजंटने संबंधित कार्यकर्त्यांनी आपल्याला धमकावल्याचा आऱोप केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पश्चिम बंगालमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ट्विट करत लोकांना मतदानासाठी आवाहन करताना कोरोनाच्या प्रोटोकॉलचं पालन करा असं असंही म्हटलं आहे.

मालदा - सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. रौता मतदारसंघातील सामसी प्राथमिक शाळेत मतदानासाठी नागरिकांनी रांग लावली होती.

सातव्या टप्प्यात 12 हजारांहून अधिक मतदान केंद्रावर मतदान होईल. यामध्ये भवानीपूर हा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघातून त्या सध्या आमदार आहेत. तसंच ममता बॅनर्जी इथं मतदानाचा हक्कही बजावणार आहेत. समसेरगंज आणि जंगीपूर इथल्या दोन उमेदवारांचे निधन झाल्यानं दोन्ही मतदारसंघांमधील मतदान स्थगित करण्यात आलं आहे. याठिकाणी 16 मे रोजी मतदान होणार आहे.