esakal | केरळमध्ये डाव्यांवर पुन्हा विश्‍वास; भाजप पुन्हा निष्प्रभ
sakal

बोलून बातमी शोधा

kerala assembly

मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांत सत्तांतर होतेस असा इतिहास आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच सलग दुसरा विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे.

केरळमध्ये डाव्यांवर पुन्हा विश्‍वास; भाजप पुन्हा निष्प्रभ

sakal_logo
By
अजयकुमार

तिरुअनंतपुरम : विधानसभा निवडणूक झालेल्या पाच राज्यांपैकी केरळमध्ये वेगळा निकाल बघायला मिळाला. केरळात सत्तांतराचा इतिहास प्रथमच मोडीत काढीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या लोकशाही आघाडी (एलडीएफ)कडे दुसऱ्यांदा राज्याची सत्ता सोपवली. मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील सरकारला मतदारांनी पसंती दिली आहे. मागील चार दशकांपासून केरळमध्ये प्रत्येक पाच वर्षांत सत्तांतर होतेस असा इतिहास आहे. मात्र यंदा पहिल्यांदाच सलग दुसरा विजय मिळवण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे.

‘माकप’चे सरकार स्वबळावर

केरळ विधानसभेच्या एकूण १४० जागांपैकी ‘एलडीएफ’ला ९९ जागा मिळाल्या असून ‘माकप’ला स्वबळावर सरकार स्थापन करेल. २०१६ मधील विधानसभा निवडणुकीत या आघाडीला ९१ जागा मिळाल्या होत्या.मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी धर्मादम येथून ५० हजार मतांनी विजय मिळविला आहे. राज्याचे आरोग्य मंत्री के. के. शैलजा यांनी ६० हजार मतांनी आघाडी घेत बाजी मारली.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी (यूडीएफ)ला यंदाही विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे. मतदारांचा हा कल गेल्या वर्षी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत दिसला होता. या आघाडीला यंदा ४१ जागांवरच समाधान मानावे लागले.

मेट्रोमनचा पराभव

देशातील बहुचर्चित चेहरा असलेल्या मेट्रोमन ई. श्रीधरन यांना भाजपने पल्लकडमधून निवडणूक आखाड्यात उतरविले. त्यामुळे ही पक्षासाठी प्रतिष्ठेची झाली होती. पण येथे काँग्रेसचे विद्यमान आमदार शफी परांबिल यांनी श्रीधरन यांचा पराभव करीत ही जागा राखली. विशेष म्हणजे १७ फेऱ्यांपैकी सुरुवातीच्या काही फेऱ्यांमध्ये आघाडी घेतलेली होती. पण जेव्हा शेवटची फेरी सुरू झाली तेव्हा पिराईरी, मथुर आणि कन्नडी या पंचायतींनी परांबिल यांना हात दिला आणि मेट्रोमनला पराभवाला सामोरे जावे लागले.

भाजप पुन्हा निष्प्रभ

देवभूमी अशी ओळख असलेल्या केरळमध्ये बस्तान बसविणे भाजपला अद्याप शक्य झालेले नाही. गेल्या निवडणुकीत भाजपचा केवळ एक उमेदवार जिंकून आला होता. यंदा एकवरून ही संख्या किमान सहावर जाण्याची अपेक्षा नेते बाळगून होते. पण राज्यात भाजप पुन्हा एकदा निष्प्रभ ठरली. नेमॉममधील एकमेव जागा गमविण्याची वेळ भाजपवर आली. तेथे ‘एलडीएफ’चे व्ही. सिवनकुट्टी यांनी भाजपच्या कुम्मानम राजशेखरन यांचा पाच हजार मतांनी पराभव केला. केरळ भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन हे कोन्नी आणि मांजेश्वर दोन जागांवर लढले. या निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्याचा दावा करणारे सुरेंद्रन यांना दोन्ही जागांवर पराभव पत्करावा लागला.

loading image