esakal | ममतादीदींना निवडणूक आयोगाचा दणका; प्रचारावर घातली बंदी

बोलून बातमी शोधा

Mamata_Banerjee

निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे.

ममतादीदींना निवडणूक आयोगाचा दणका; प्रचारावर घातली बंदी
sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- निवडणुकीच्या आचार संहितेचा भंग केल्याप्रकरणी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. त्यांच्यावर 24 तासांची बंदी घालण्यात आली आहे. यादरम्यान, त्या प्रचार करु शकणार नाहीत. मुस्लिम मतदारांना मतांचे विभाजन न होऊ देण्याचे आवाहन आणि महिलांना सुरक्षादलांना घेराव करण्याचा दिलेला सल्ला यासाठी निवडणूक आयोगाने त्यांना नोटिस जारी केली होती. ममतांच्या उत्तराने समाधानी नसलेल्या निवडणूक आयोगाने त्यांच्यावर कारवाई केली आहे. ममता बॅनर्जी यांच्यावरील बंदीचा आदेश तत्काळ लागू झाला आहे. सोमवारी रात्री 8 ते मंगळवारी 8 पर्यंत त्या प्रचार करु शकणार नाहीत. निवडणूक आयोगाने त्यांना भविष्यात अशाप्रकारचे वक्तव्य न करण्याचा सल्ला दिला आहे. निवडणूक आयोगाने ममतांच्या वक्तव्याची निंदा केली असून अशा वक्तव्यांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते, असं म्हटलं आहे. 

निवडणूक आयोगाने म्हटलं की, 'ममता बॅनर्जी या राज्याच्या मुख्यमंत्री आहेत. त्यांनी आचार संहितेसह लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 च्या कलम 123(3) आणि 3a आणि आयपीसी, 1860 चे कलम 186, 187 आणि 5050 चे उल्लंघन केले आहे. त्यांनी अत्यंत भडखाऊ वक्तव्य केलं असून यामुळे कायदा सुव्यवस्थेची स्थिती बिघडू शकते. त्यामुळे निवडणूक प्रक्रियेला बाधा निर्माण होऊ शकते.' निवडणूक आयोगाच्या निर्णय ममतांसाठी मोठी धक्का असणार आहे. कारण त्यांच्या प्रचारावर 24 तासांची बंदी येणार आहे. दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये 4 टप्प्यातील मतदान पार पडले आहे. भाजप आणि तृणमूल काँग्रेसकडून जोरदार प्रचार सुरु असल्याचं पाहायलं मिळालं. निकाल 2 मेला लागणार आहे.