West Bengal Elections LIVE: इतकी वाईट निवडणूक कधीही पाहिली नाही- ममता

mamta banarjee.
mamta banarjee.

नवी दिल्ली : West Bengal, Assam Elections Phase 2 Live: आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान आज (दि.1) सकाळी 7 वाजता सुरु झाले. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात सकाळी 9 पर्यंत आसाममध्ये (Assam Assembly Election 2021) 10.51 टक्के आणि पश्चिम बंगालमध्ये (West Bengal Assembly Election 2021) सकाळी साडेअकरा पर्यंत 37.42 टक्के मतदान झाले आहे. आसाममध्ये 39 जागांवर तर पश्चिम बंगालमध्ये दुसऱ्या टप्प्यात 30 जागांवर उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत. आजच्या टप्प्यात सर्वांची नजर हायप्रोफाइल नंदीग्राम मतदारसंघावर संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपले पूर्वीचे सहकारी तसेच भाजपचे उमेदवार सुवेंदू अधिकार यांच्याविरोधात मैदानात उतरले आहेत. तर आसामामध्ये पाच मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष आणि विरोधी पक्षातील काही महत्त्वाच्या नेत्यांच्या राजकीय कारकीर्दीचा निर्णय आज ठरणार आहे. मतदान सायंकाळी सहा वाजेपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्थेत होणार आहे.

अपडेट्स :

--विजयासाठी मी 'V' साईन दाखवते आहे. निवडणूक आयोग आणि अमित शहांनी कृपया त्यांच्या गुंडांना सांभाळावं. मी राज्यपालांसोबत काय बोलले ते सांगणार नाही. पण, इतकी वाईट निवडणूक कधीही पाहिली नाही, असं ममता बॅनर्जी म्हणाल्यात. 

- टीएमसीचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी निवडणूक आयोगाकडे बुथ कॅप्चरची तक्रार दाखल केली आहे. नंदीग्राम मतदारसंघात भाजपच्या मोठ्या जमावाने बुथ कॅप्चर केलं आहे, अशी तक्रार त्यांनी केली आहे. 

- निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, दुपारी 12 वाजेपर्यंत बंगालमध्ये 37.42 टक्के मतदान पार पडलं आहे. राज्यात काही ठिकाणी हिंसक घटना घडल्या आहेत.

- समसाबाद कांचन नगरमध्ये एका भाजप कार्यकर्त्याला मारण्यात आलं आहे. तर टीएमसीच्या धमक्यांमुळे एकाने आत्महत्या केली आहे. बाकी वातावरण शांत आहे. - सुवेंदु अधिकारी, नंदीग्राम मतदारसंघातील भाजपचे उमेदवार

केशपूर विधानसभा मतदारसंघात टीएमसीच्या कार्यकर्त्याकडून 173 नंबरच्या पोलिंग बूथवरील भाजपच्या महिला पोलिंग एजंटला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्यांना दवाखान्यात नेण्यात आलं आहे. तसेच स्थानिक भाजप नेते तन्मय घोष यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे, अशी तक्रार भाजपच्या उमेदवाराने केली आहे. 

- मतदानापूर्वी पश्चिम बंगालमध्ये टीएमसीच्या कार्यकर्त्याची हत्या

काल रात्री धारदार शस्त्राने या कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. यासंदर्भात आठ जणांना अटक करण्यात आली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com