esakal | West Bengal पोटनिवडणूक - ममता बॅनर्जींची बाजी; भाजपच्या प्रियांका पराभूत
sakal

बोलून बातमी शोधा

West Bengal - ममता बॅनर्जींची बाजी; भाजपच्या प्रियांका पराभूत

विधानसभा निवडणुकीत तृणमूलने राज्यात सत्ता मिळवली तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र विजय मिळवता आला नव्हता.

West Bengal - ममता बॅनर्जींची बाजी; भाजपच्या प्रियांका पराभूत

sakal_logo
By
टीम ई सकाळ

पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या तीन जागांसाठी पोटनिवडणूकीची मतमोजणी सुरु आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या भवानीपूर मतदारसंघात १४ व्या फेरीअखेर ३७ हजार मतांनी आघाडीवर घेतली होती. शेवटच्या फेरीअखेर त्यांनी ५८ हजार ८३२ मतांनी विजय मिळवला आहे. भाजपच्या उमेदवार प्रियांका टिबरेवाल यांना पराभवाने ममता बॅनर्जींच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला आहे. ममता बॅनर्जी यांना मिळालेल्या मोठ्या आघाडीनंतर पक्षाच्या कार्यलयात जल्लोष सुरु आहे.

भवानीपूरसह जग्नीनपूर आणि समशेरगंज या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली. यात भवानीपूर मतदारसंघाकडे देशाचे लक्ष लागून राहिले होते. राज्यात सत्ता मिळवली असली तरी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना मात्र विजय मिळवता आला नव्हता. आता पोटनिवडणुकीत त्या भवानीपूर या त्यांच्या पारंपरिक मतदारसंघातून मैदानात उतरल्या होत्या. गुरुवारी यासाठी मतदान पार पडले असून आज मतमोजणी झाली.

भवानीपूरमध्ये ममता बॅनर्जी यांच्याविरोधात भाजपने प्रियांका टिबरेवाल यांना उमेदवारी दिली होती. ममता बॅनर्जी यांचा विजय निश्चित मानला जात होता. मात्र प्रियांका यांनी प्रचारावेळी जोरदार हल्लाबोल केला होता. भवानीपूरमध्ये जवळपास ५३ टक्के मतदान झाले होतेे.

बोगस मतदान झाल्याचा भाजपचा आरोप

समशेरगंज व जग्नीपूर येथे अनुक्रमे ५७.१५ व ५३.७८ टक्के मतदान झाले. पद्दापुकुर येथे एका शाळेतील केंद्रावर बनावट मत देणाऱ्या दोघांना पकडल्याचा दावा भाजपचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी कल्याण चौबे यांनी केला. ‘बनावट मतदारांना पकडल्यावर काही वेळाने आठ-दहा लोग मोटारसायकलवरून आले आणि त्‍यांनी माझ्यावर व माझ्या मोटारीवर काठ्या व दगडांनी हल्ला केला. ते सर्वजण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते,’ असा आरोप चौबे यांनी केला.

‘तृणमूल’च्या नेत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपच्या एका समर्थकाला अटक करण्‍यात आली. यावरून मत देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने काही जणांना पैसे पुरविल्याचा व खोटे मतदान झाल्याचा आरोप टिबरेवाल यांनी केला. दक्षिण कोलकतामधील जिल्हा मतदान अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला.

loading image
go to top