Digital Arrest Case: 'डिजिटल अरेस्टप्रकरणी नऊ जणांना जन्मठेप'; प. बंगालमधील कोर्टाचे आदेश, देशातील पहिलाच निवाडा
First-Ever Verdict in India: या प्रकरणामध्ये दोषींनी चॅटर्जी यांना वेगवेगळ्या खात्यांवर रक्कम हस्तांतरित करायला भाग पाडल होते. रानाघाट पोलिस हे या प्रकरणाचा तपास करत होते. पोलिसांनी केलेल्या चौकशीतून भारतीय सीम कार्ड वापर करून कंबोडियातून चॅटर्जी यांनी कॉल करण्यात आल्याचे उघड झाले होते.
कोलकता: डिजिटल अरेस्ट सायबर गैरव्यवहारप्रकरणी पश्चिम बंगालमधील न्यायालयाने नऊ जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. एखाद्या न्यायालयाने दोषींना सायबर गैरव्यवहारप्रकरणी शिक्षा ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.